घटस्फोट, दुसरं लग्न अन् आता होणार आई! लातूरची सून IAS टीना डाबी यांच्या डोहाळ जेवणाचा थाट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 06:59 PM2023-09-10T18:59:32+5:302023-09-10T19:01:53+5:30

Baby Shower Of IAS Tina Dabi : आयएएस अधिकारी टीना डाबी ह्या लवकरच आई बनणार आहेत.

राजस्थानमधील प्रसिद्ध आणि सतत चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी टीना डाबी यांच्या घरी लवकरच एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी त्यांनी पती आयएएस अधिकारी प्रदीप गावडे आणि कुटुंबासोबत डोहाळ जेवणाचे खास क्षण साजरे केले. या अविस्मरणीय क्षणाचे फोटो टीना दाबी यांची लहान बहीण आणि आयएएस अधिकारी रिया डाबी यांनी शेअर केले आहेत.

आयएएस अधिकारी टीना डाबी ह्या लवकरच आई बनणार आहेत. डाबी यांच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात अन्य अधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली.

यावेळी आयएएस दाम्पत्याने केक देखील कापला. खरं तर २०२२ मध्ये आयएएस टीना डाबी यांनी आयएएस अधिकारी प्रदीप गावडे यांच्याशी लग्न केले.

प्रदीप गावडे यांचे कुटुंब मराठी आहे. तर, टीना डाबी यांची आई मराठी आणि वडील राजस्थानी आहेत.

मागील वर्षी एप्रिल महिन्यात टीना डाबी यांनी महाराष्ट्रातील लातूरचे सुपुत्र प्रदीप गावंडे यांच्यासोबत विवाहगाठ बांधली.

दरम्यान, टीना डाबी यांनी आपला पहिला पती अतहरसोबत घटस्फोट घेऊन प्रदीप यांच्यासोबत सातफेरे घेतले. २०१५च्या IAS टॉपर टीना डाबी आणि त्यांचे पती IAS अतहर खान यांचा घटस्फोट झाला आहे.

टीना डाबी राजस्थानातील जैसलमेरमध्ये कलेक्टर पदाची जबाबदारी पार पाडत आहे.

सध्या त्या त्यांच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या बहिणीने डोहाळ जेवणाचे खास फोटो शेअर केले आहेत.