किती गोड..! सीमा हैदरच्या गोंडस मुलीचा पहिला फोटो समोर, कुटुंबात आनंदाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 20:46 IST2025-03-18T20:37:53+5:302025-03-18T20:46:55+5:30
पाकिस्तानी सीमा हैदरला भारतीय सचिन मीणा याच्याकडून पाचवे आपत्य झाले आहे.

PUBG खेळता-खेळता भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या पाकिस्तानी सीमा हैदरने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या सीमा हैदरला भारतीय पती सचिन मीना याच्यापासून हे पाचवे अपत्य झाले आहे. सीमा हैदर PUBG द्वारे सचिनच्या संपर्कात आली अन् आपल्या चार मुलांसह बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात गाठले.
पाकिस्तानातून आलेल्या आणि ग्रेटर नोएडामध्ये सचिन मीनासोबत राहणाऱ्या सीमा हैदरच्या मुलीचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. या फोटोत सीमा रुग्णालयाच्या बेडवर आपल्या गोंडस मुलीसोबत दिसत आहे.
हा व्हिडिओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला. मे 2023 मध्ये आपल्या चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरचे हे पाचवे आपत्य आहे. या मुलीच्या जन्माने सीमाचा भारतीय पती सचिन मीना खूप खुश असून, त्याच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, सीमा हैदरला तिचा पहिला पती गुलाम हैदरपासून चार मुले आहेत. मे 2023 पूर्वी सीमा गुलामसोबत पाकिस्तानमध्ये राहत होती. मात्र PUBG खेळता-खेळता तिची 2020 मध्ये सचिन मीणाशी ओळख झाली.
ग्रेटर नोएडामध्ये राहणारा सचिन आणि पाकिस्नी सीमा हळुहळू प्रेमात पडले. यानंतर सचिन मीणाने सीमाला तिच्या चारही मुलांसह स्वीकारण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सीमा बेकायदेशीरपणे भारतात आली आणि सचिनसोबत लग्न केले.
सीमा पाकिस्तानातून नेपाळमध्ये आली, सचिन मीनाही नेपाळला पोहोचला. तिथे दोघांनी एका मंदिरात लग्न केले. लग्नानंतर दोघेही आपापल्या देशात परतले. यानंतर सीमा हैदर मे 2023 मध्ये तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली आणि येथे सचिन मीनाच्या घरी राहू लागली.
पाकिस्तानातून आलेल्या सीमाची देशभरात चर्चा सुरू झाली. अनेकांनी तिच्यावर गुप्तहेर असल्याचा आरोप केला. यामुळे गुप्तचर यंत्रणांना सीमाची बरेच दिवस कसून चौकशी केली. चौकशीअंती काहीच आढळले नाही.
यानंतर सीमा हैदरने सचिनशी अधिकृतपणे लग्न केले आणि आता ती भारतात राहत आहे. सचिनसोबत दीड वर्षांहून अधिक काळ राहिल्यानंतर सीमा हैदरने आता पाचव्या मुलीला जन्म दिला आहे.