Gold Rate Today: सोन्याचा दरात वाढ; चांदीचा भावही वाढला, काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 01:40 PM2021-09-27T13:40:49+5:302021-09-27T13:44:29+5:30

मागील सत्रात सोने दर 0.13 टक्के घसरणीसह सहा महिन्यांच्या खालील स्तरावर पोहोचला होता.

भारतीय बाजारात सोन्याच्या दरात पु्न्हा वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर गोल्ड फ्यूचर्स रेट 0.33 टक्क्यांच्या वाढीसह 46,147 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदी एका टक्क्याच्या वाढीसह 60,583 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.

मागील सत्रात सोने दर 0.13 टक्के घसरणीसह सहा महिन्यांच्या खालील स्तरावर पोहोचला होता. तर चांदीमध्ये 1.4 टक्क्यांची घसरण झाली होती. मागील वर्ष 2020 मध्ये 56,200 रुपये रेकॉर्ड स्तरावरुन यावर्षी सोने दर जवळपास 10000 रुपयांनी स्वस्त आहे.

दरम्यान, आगामी काळ सणासुदीचा असल्याने सोन्याचे भाव पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करु शकतात. डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव पुन्हा 52 हजार रुपये प्रतितोळा इतका होईल, असेही सांगितले जात होते.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.