ट्विटरवर केजरीवाल No. 1 CM, योगी आदित्यानाथही पुढे; एकनाथ शिंदे कितवे?, जाणून घ्या...!

By मुकेश चव्हाण | Published: December 16, 2022 02:33 PM2022-12-16T14:33:28+5:302022-12-16T15:55:21+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.

भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे ट्विटरचा सर्वाधिक वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला देशाच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंटबद्दल सांगणार आहोत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह देशातील इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे किती फॉलोअर्स आहेत ते जाणून घेऊया?

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे २६.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. केजरीवाल २१६ लोकांना फॉलो करतात.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे २२.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. 2015 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर अकाउंट सुरु केले होते. योगी यांनी ५२ लोकांना फॉलो करतात.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आता ८० लाख ८० हजार फॉलोअर्स आहेत. सीएम शिवराज ३९४ लोकांना फॉलो करतात.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे ट्विटर अकाउंटवर एकूण ८० लाख फॉलोअर्स आहेत. सध्या ते ४३ लोकांना फॉलो करतात.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ट्विटरवर ७० लाख फॉलोअर्स आहेत. ममता बॅनर्जी ४७ लोकांना फॉलो करतात.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ट्विटरवर एकूण ४० लाख तीस हजार फॉलोअर्स आहेत.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे ३० लाख ५० हजार फॉलोअर्स आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन २०१३ पासून ट्विटरवर सक्रिय आहेत. स्टॅलिनचे आता ३० लाख ४० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. स्टॅलिन ८८ लोकांना फॉलो केले आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे ट्विटरवर एकूण २.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे ट्विटरवर २०.२ लाख फॉलोअर्स आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे ट्विटरवर एकूण १८ लाख फॉलोअर्स आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान सिंग २०१० पासून ट्विटरवर सक्रिय आहेत. मान सिंहचे सध्या १० लाख २० हजार ट्विटर फॉलोअर्स आहेत.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन १० लाख फॉलोअर्स आहेत. विजयन स्वतः फक्त १९ लोकांना फॉलो करतात.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नऊ लाख ८२ हजार फॉलोअर्स आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ट्विटरवर खूप सक्रिय असतात. शिंदे यांचे आता नऊ लाख ६८ हजार फॉलोअर्स आहेत. तर, शिंदे २६ जणांना फॉलो करतात.

भूपेश बघेल: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे ट्विटरवर एकूण आठ लाख २० हजार फॉलोअर्स आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे ट्विटरवर एकूण ४.४६ लाख फॉलोअर्स आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी २००९ पासून ट्विटरवर सक्रिय आहेत. धामी यांचे सध्या तीन लाख १५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे ४ लाख १७ हजार फॉलोअर्स आहेत. बोम्मई स्वतः 127 लोकांना फॉलो करतात.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचे ट्विटरवर दोन लाख ५६ हजार फॉलोअर्स आहेत.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांचे सध्या एक लाख ८५ हजार फॉलोअर्स आहेत.

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांचे सध्या एक लाख ५७ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. संगमा २५५ लोकांना फॉलो करतात.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे ट्विटर अकाउंटवर एकूण एक लाख ३० हजार फॉलोअर्स आहेत.

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ देखील ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. ८९ हजार फॉलोअर्स आहेत. रिओ स्वतः ६१ लोकांना फॉलो करतो.

मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा हे देखील ट्विटर यूजर आहेत. झोरामथांगाचे सध्या ८२ हजार ९०० फॉलोअर्स आहेत.

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचे ३२ हजार ६०० ट्विटर फॉलोअर्स आहेत.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांचे २५ हजार फॉलोअर्स आहेत.

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग २०१९ पासून ट्विटरवर आहेत. तमांगचे देशभरातील मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात कमी १४ हजार फॉलोअर्स आहेत. तमांग स्वतः ४९ लोकांना फॉलो करतो.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव स्वतः ट्विटरवर नाहीत. त्यांनी दिलेली माहिती तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आली आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर १० लाख ५० हजार फॉलोअर्स आहेत.