Corona Virus : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वेगाने प्रसार; किती धोकादायक?; WHO आणि तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:57 PM2023-09-05T12:57:29+5:302023-09-05T13:14:36+5:30

Corona Virus : जगभरातील आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पिरोलाला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे.

जगात कोरोना व्हायरस पुन्हा एकदा रिटर्न मोडमध्ये आला आहे. Covid-19, Aris (EG.5) आणि Pirola (BA.2.86) च्या नवीन व्हेरिएंटने जगातील अनेक देशांमध्ये एन्ट्री केली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे नवीन प्रकार: एरिस नंतर आता पिरोला वेगाने पसरत आहे.

जगभरातील आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पिरोलाला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की पिरोलामध्ये 30 हून अधिक म्यूटेशन्स आढळले आहेत. हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पिरोला (BA.2.86) व्हेरिएंटची प्रकरणे ज्या प्रकारे वाढत आहेत, आरोग्य तज्ञ याला अधिक धोकादायक मानत आहेत. त्यामुळे प्रत्येक देशाने सतर्क राहण्याची गरज आहे.

अमेरिका व्यतिरिक्त, या व्हेरिएंटचा यूके, डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका आणि इस्रायल सारख्या अनेक देशांमध्ये प्रसार झाला आहे. या देशांमध्ये त्याची प्रकरणे वेगाने पसरत आहेत. सर्व सरकार आणि प्रशासनही याबाबत पूर्णपणे सतर्क आहेत.

नवीन व्हेरियंटच्या प्रसाराचा वेग एका आठवड्यातच जगभरात दुप्पट झाला यावरून अंदाज लावता येतो. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. जर आपण जगातील महासत्ता अमेरिकेबद्दल बोललो तर येथेही एका आठवड्यात कोविड रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 21 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) च्या ताज्या आकडेवारीनुसार, कोविडमुळे एका आठवड्यात 10,000 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या प्रकरणांमुळे, काही शाळा, रुग्णालये आणि संस्थांमध्ये लोकांना पुन्हा मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे. सीडीसी संचालक मँडी कोहेन यांनी इशारा दिला की लसीकरण न केलेल्या लोकांसाठी कोविड धोकादायक आहे.

विशेषत: लसीकरण न केलेल्या व्यक्तींसाठी धोका जास्त असतो. त्याच वेळी, ज्यांना यापूर्वी संसर्ग झाला नाही आणि जे वृद्ध आहेत किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहेत त्यांना देखील धोका असू शकतो.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा असेल तर ते किती धोकादायक आहे की नाही. याबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तथापि, काही संशोधनाच्या आधारावर, ते अधिक सांसर्गिक मानले जाते. पिरोला हे ओमायक्रॉनचे फक्त एक व्हेरिएंट आहे, ज्यापासून दुसरे सब-व्हेरिएंट Eris (EG.5.1) पूर्वी पाहिले गेले आहे.

एका मेडिकल रिपोर्टचा हवाला देत, येल मेडिसिनमधील संसर्गजन्य रोगांचे तज्ञ स्कॉट रॉबर्ट्स यांनी नवीन व्हेरिएंटबाबत सांगितलं आहे की, या नवीन व्हेरिएंटमध्ये म्यूटेशनची संख्या खूप जास्त आहे. डेल्टाच्या सुरुवातीच्या रूपांमध्ये समान प्रमाणात म्यूटेशन दिसून आले. असे म्हटले जाते की जेव्हा म्युटेशनची संख्या वाढते तेव्हा लसीचा प्रभाव कमी होतो.

रिपोर्टनुसार, पिरोला व्हेरिएंट (BA.2.86) ची लागण झालेल्यांमध्ये सामान्यतः फक्त ताप आणि सामान्य सर्दी-फ्लू सारख्या रोगांची लक्षणे दिसतात. काही लोकांना खोकला, थकवा, डोकेदुखी आणि अंगदुखी, भूक न लागणे, पुरळ, अतिसार आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत आहे.

रोग नियंत्रण केंद्र (CDC) म्हणते की पिरोला प्रकारासह लसीकरण केलेल्यांना देखील संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. दरम्यान, आठवडाभरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहिल्यास. अशा परिस्थितीत कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज भासू लागली आहे.

आरोग्य तज्ज्ञ मास्क घालण्याचे आवाहन करत आहेत. अमेरिका काही ठिकाणी, विशेषत: शाळा, रुग्णालये आणि संस्थांमध्ये लोकांना पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन करत आहे जेणेकरून त्याचा प्रसार थांबवता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.