Coronavirus : लय भारी! Youtube च्या मदतीने 'या' फुलांपासून तयार केलं स्वस्त आणि मस्त सॅनिटायझर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:39 PM2020-04-29T16:39:44+5:302020-04-29T17:35:54+5:30

Coronavirus : सॅनिटायझरचा तुडवडा निर्माण झाला असून त्याच किंमत वाढली आहे. अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझरची विक्री केली जात आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 31,332 हून अधिक झाली असून आतापर्यंत 1007 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात 7027 जणांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे. लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत.

सॅनिटायझरचा तुडवडा निर्माण झाला असून त्याच किंमत वाढली आहे. अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझरची विक्री केली जात आहे.

Youtube वर व्हिडीओ पाहून आदिवासी महिलांनी फुलांपासून स्वस्त आणि मस्त सॅनिटायझर तयार केलं आहे.

आदिवासी पाड्यांवरील महिलांनी दारूसाठी वापरण्यात येणाऱ्या महुआच्या फुलांपासून सॅनिटायझर तयार केलं आहे. तसेच स्वस्त दराने विकण्यास सुरुवात केली आहे.

अलिराजपूर जिल्ह्यातील 10 आदिवासी महिलांच्या गटाने यूट्यूबवर सॅनिटायझर कसं तयार केलं जातं हे पाहिलं आणि त्यातून त्यांना कल्पना सुचली.

महुआच्या फुलांपासून तयार करण्यात आलेल्या या सॅनिटायझरची आरोग्य विभागानेही तपासणी केली असून ते उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे.

महुआपासून तयार करण्यात आलेल्या सॅनिटायझरची किंमत फक्त 70 रुपये आहे. 200 मिली बाटली ही बाजारात 70 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

आदिवासी महिलांनी तयार केलेल्या सॅनिटायझरची स्थानिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडून प्रथम चाचणी करण्यात आली.

सर्व निकषांची पूर्तता करण्यास सक्षम असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सॅनिटायझर बाजारात आणण्यात आलं आहे.

सॅनिटायझरमध्ये तुरटी, कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने आणि गुलाब जल वापरण्यात आलं आहे.

शाळा, बँका, सरकारी संस्थांमध्ये हे सॅनिटायझर देणार असल्याची माहिती या महिलांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.