शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : लढ्याला यश! औषध किंवा लस नाही तर आता 'या' थेरेपीने होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 3:36 PM

1 / 12
जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशात प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 12
कोरोनामुळे आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 84 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना पुढे अनेक देश हतबल झाले आहेत.
3 / 12
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात 12000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तब्बल साडे तीन लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.
4 / 12
कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही.
5 / 12
औषध अथवा लस नाही तर आता कोरोनाच्या लढ्यात रुग्णांवर उपचार करताना एक नवीन थेरपी वापरली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टर कोरोनाग्रस्तांसाठी थेरपी वापरण्याच्या तयारीत आहेत.
6 / 12
कोरोना रुग्णांवर उपचार करताना आता रेडिएशन थेरपी वापरण्यात येत आहे. रुग्णांमधील न्यूमोनियाचा परिणाम कमी करण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (AIIMS) संशोधन सुरू केलं आहे.
7 / 12
AIIMSच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि या संशोधनाचे प्रमुख अभ्यासक डॉ. डीएन शर्मा यांनी ऑक्सिजनवर असलेल्या दोन कोरोना रुग्णांना रेडिएशन थेरपी देण्यात आल्याची माहिती दिली.
8 / 12
डॉ. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कोरोना रूग्णांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. या कोरोना रूग्णांना यापूर्वी ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
9 / 12
रेडिएशन थेरपीनंतर या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आता त्यांचा ऑक्सिजन सपोर्ट काढण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. कॅन्सरवरील उपचारात रेडिएशन थेरपीचा हाय डोस दिला जातो.
10 / 12
कोरोन रुग्णांना कमी डोसची रेडिएशन थेरपी देण्यात आली. या थेरपीचा कोणताही वाईट परिणाम त्यांच्यावर झाला नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
11 / 12
जेव्हा अँटीबायोटिक्स उपलब्ध नव्हते, तेव्हा रेडिएशन थेरपी 1940 च्या दशकात न्यूमोनियाच्या उपचारात वापरली जात असल्याचं देखील शर्मा यांनी सांगितलं आहे.
12 / 12
पायलट प्रोजेक्टअंतर्गत आणि कोरोनाच्या 8 रुग्णांवर रेडिएशन थेरपीद्वारे उपचार केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यानंतर येणाऱ्या रिझल्टचं विश्लेषण केलं जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालयdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलIndiaभारतDeathमृत्यू