शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : लढ्याला यश! फक्त 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट, एका तासात येणार रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 5:01 PM

1 / 15
कोरोनाच्या धक्कादायक आकडेवारीने चिंता वाढवली आहे. देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांचा आकडा 14 लाखांवर पोहोचला आहे.
2 / 15
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 14,35,453 वर गेली आहे तर आतापर्यंत देशभरात तब्बल 32,771 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
3 / 15
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 49,931 नवे रुग्ण आढळून आले असून 708 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संदर्भात विविध ठिकाणी संशोधन करण्यात येत आहे.
4 / 15
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचे प्रयत्न हे केले जात आहे. अनेक ठिकाणी संशोधन केले जात आहे.
5 / 15
कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असताना आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. आता फक्त 400 रुपयांत कोरोना टेस्ट होणार असून एका तासात रिपोर्ट मिळणार आहे.
6 / 15
भारतातील संशोधकांनी कोरोनावर एक खास किट विकसित केलं आहे. यामुळे अवघ्या 400 रुपयांत कोरोनाची टेस्ट करता येणार आहे.आयआयटी खरगपूरने कोरोना रॅपिड टेस्ट किटची निर्मिती केली आहे.
7 / 15
रॅपिड टेस्ट किटच्या मदतीने कमी वेळेत कोरोनाचे रिपोर्ट मिळणार आहेत. स्मार्टफोनमध्ये देखील हा रिपोर्ट उपलब्ध होणार आहे. अ‍ॅपच्या मदतीने हे सहज शक्य होणार आहे.
8 / 15
पोर्टेबल नॉन-इनवेसिव रॅपिड डिटेक्शन टेस्ट किटची कॉन्‍सेप्‍ट ही आयआयटी खरगपूरचे मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रो.सुमन चक्रवर्ती आणि स्‍कूल ऑफ बायो सायन्सचे डॉ. अरिंदम मंडल यांची आहे.
9 / 15
आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी या टेस्टसाठी विकसित केलेल्या उपकरणाचा खर्च सुमारे दोन हजार रुपये आहे. तर, आरटी पीसीआर मशीनचा खर्च काही लाखांच्या आसपास असल्याची माहिती मिळत आहे.
10 / 15
आयआयटी खरगपूरचे हे उपकरण अतिशय कमी संसाधनांमध्ये काम करणार आहे. यामुळे तपासणीपासून वंचित राहिलेल्या अनेक लोकांना टेस्ट किटमुळे दिलासा मिळणार आहे.
11 / 15
रॅपिड किटच्या मदतीने अचूक रिपोर्ट मिळणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. कमी किंमतीत आणि कमी वेळात कोरोनाचे निदान होणं यामुळे शक्य होणार आहे.
12 / 15
कोरोना व्हायरससोबतच या टेस्ट किटच्या मदतीने कोणत्याही अन्य प्रकारच्या आरएनए व्हायरसची देखील माहिती मिळणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
13 / 15
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे. तर तब्बल सहा लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
14 / 15
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती आहे.
15 / 15
जगभरातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतच गंभीर इशारा दिला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू