शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय; आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 10:06 AM

1 / 12
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
2 / 12
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 82 लाखांवर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
3 / 12
देशातील रुग्णांची संख्यादेखील सातत्याने वाढतेच आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्या उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.
4 / 12
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
5 / 12
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात कोरोनाचे तब्बल 10,974 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
6 / 12
कोरोनामुळे 11903 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 3,54,065 वर पोहोचली आहे.
7 / 12
देशात कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्राने आता कोरोना चाचणीची क्षमता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता दर दिवशी 3 लाख लोकांच्या चाचण्या करता येणार आहेत.
8 / 12
रेड झोन आणि हॉटस्पॉटमध्ये राहणाऱ्या लोकांची चाचणी कऱणं आता अधिक सोपं होणार आहे. लक्षण असणाऱ्यांसोबतच लक्षण नसलेल्या लोकांचीही चाचणी करण्याचा प्रस्ताव आहे.
9 / 12
देशात 907 कोरोनासाठी लॅबोरेट्री तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 659 सार्वजनिक क्षेत्रातील आणि 248 खासगी क्षेत्रातील आहेत. आतापर्यंत 59 लाख 21 हजार 69 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
10 / 12
देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपचारासाठीची सर्व उपकरणे अधिक संख्येने उपलब्ध असणं गरजेचं आहे.
11 / 12
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 12
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूmedicinesऔषधंhospitalहॉस्पिटल