शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : लॉकडाऊनचा असाही फायदा; 40 वर्षांत जे झालं नाही ते घडलं, तुम्हीही म्हणाल अरे व्वा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:00 PM

1 / 14
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 17 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
2 / 14
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 78,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 2400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे.
3 / 14
पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. लॉकडाऊनमध्येही काही दिलासादायक गोष्टी ही समोर येत आहेत.
4 / 14
कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र याचा पर्यावरणावर फारच चांगला परिणाम होतो आहे. नद्यांचं पाणी स्वच्छ होतं आहे, ओझोनचा थरही पूर्ववत होत आहे.
5 / 14
लॉकडाऊनचा आणखी एक फायदा भारताला झाला आहे. गेल्या 40 वर्षांत जे झालं नाही ते आता घडलेलं पाहायला मिळतं आहे.
6 / 14
भारतात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनचं ( Carbon Emissions) प्रमाण कमी झालं आहे. गेल्या चार दशकांत पहिल्यांदाच उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
7 / 14
कार्बन ब्रीफच्या रिपोर्टनुसार, भारतात अनेक वर्षांनी पहिल्यांदाच लक्षणीय प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र हे फक्त लॉकडाऊनमुळे नाही असंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
8 / 14
Centre for Research on Energy and Clean Air (CREA) ने हा अभ्यास केला आहे. 2019-20 या मार्च महिन्याच्या अखेरीस कार्बन उत्सर्जन 15 टक्क्यांनी कमी झालं आहे.
9 / 14
भारतात लॉकडाऊनपूर्वी विजेचा वापर कमी झाला होता. नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर वाढला आणि त्यामुळे पारंपारिक ऊर्जेची मागणी कमी झाली.
10 / 14
यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि 40 वर्षांत पहिल्यांदाच भारतात कार्बन उत्सर्जनवाढीचा ट्रेंड बदलल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
11 / 14
कोळशापासून वीजनिर्मितीचं उत्पादन हे मार्चमध्ये 15 टक्के घटलं आणि कार्बन उत्सर्जन 15 टक्के कमी झालं आहे.
12 / 14
एप्रिलच्या पहिल्या 3 आठवड्यात कोळशापासून वीजनिर्मिती 31 टक्के कमी झाली आहे, त्यामुळे एप्रिलपर्यंत कार्बन उत्सर्जन 30 टक्क्यांपर्यंत कमी होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
13 / 14
गाड्यांचा धूर, कोळशापासून वीजनिर्मिती यामधून सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन होतं असतं.
14 / 14
हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याenvironmentपर्यावरणIndiaभारतpollutionप्रदूषणelectricityवीज