CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! देशात 10 दिवसांत तब्बल 10,000 जणांचा मृत्यू; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 09:19 AM2020-08-27T09:19:47+5:302020-08-27T09:36:10+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील रुग्णसंख्या रोज नवा उच्चांक गाठत असून 32 लाखांचा टप्पा आता पार केला आहे.

कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 32 लाखांच्या वर गेला आहे.

देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. याच दरम्यान कोरोनाचा धक्कादायक ग्राफ समोर आला आहे.

गेल्या 10 दिवसांत देशात कोरोना व्हायरसमुळे तब्बल 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसाला जवळपास 1000 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे.

देशातील रुग्णसंख्या रोज नवा उच्चांक गाठत असून 32 लाखांचा टप्पा आता पार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे अनेक नवे रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 लाख 34 हजार 475 वर पोहोचली असून कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 59,449 वर पोहोचला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 7,07,267 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 24,67,759 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा लक्षणं दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत.

कोरोना रुग्णांना लवकर शोधून काढणे व संसर्ग झालेल्यांचे प्राण वाचविणे या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटलं आहे.

देशातील विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल आणि आसाममध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे.