PHOTOS : प्रेमाला 'सीमा' नाही! भारतीय 'वर' अन् चीनमधील 'वधू', बिहारमध्ये पार पडला विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 07:34 PM2023-12-13T19:34:51+5:302023-12-13T19:40:24+5:30

पाकिस्तानातील तरूणी सीमा हैदर हिने भारतातील सचिनशी लग्न करण्यासाठी देशाची सीमा ओलांडली.

प्रेमाला सीमा नाही, याचा प्रत्यय अनेकदा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानातील तरूणी सीमा हैदर हिने भारतातील सचिनशी लग्न करण्यासाठी देशाची सीमा ओलांडली. हे जोडपं मागील काही महिने प्रसिद्धीच्या झोतात होतं. आजतागायत या दोघांच्या बातम्या सातत्याने कानावर पडतात.

प्रेमासाठी देशाची सीमा ओलांडल्याची आणखी एक ताजी घटना बिहारमध्ये घडली. खरं तर इथे परदेशी वधू आणि स्थानिक तरूण वर म्हणून मंडपात असल्याचे पाहून या विवाहाची एकच चर्चा रंगली. बिहारमधील तरूणानं चीनमधील तरूणीसोबत सातफेरे घेतले.

दरम्यान, चीनमध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली. मग मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील खगरिया येथे झालेल्या या लग्नाची सध्या खूप चर्चा आहे.

मंगळवारी खगरिया येथील राजीव आणि चीनमधील लिऊ यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला. दोघांमध्ये मागील दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

एक बिहारी तरूण चीनमधील तरूणीच्या प्रेमात पडला अन् या प्रेमाचा प्रवास अखेर लग्नापर्यंतही पोहचला. हा विवाहसोहळा बिहारमधील खगरिया येथे झाला, ज्यासाठी तरूणी चीनमधून इथे आली.

नवरदेव राजीव कुमार चीनमध्ये शिक्षणासाठी गेला होता. तिथे त्याची लिऊशी भेट झाली. दोघेही प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, व्हिसा न मिळाल्याने मुलीचे कुटुंबीय लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत.

परदेशी तरूणी आणि बिहारी मुलाचा हा विवाह पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. खगरियाच्या बाबूगंज येथील राजीव हा तरुण चीनमध्ये वास्तव्यास आहे, तिथे त्याने चीनच्या भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यासात पदव्युत्तर शिक्षण घेतले. चीनची राजधानी बीजिंग येथे राहणारी लुई डॅन ही देखील राजीव शिकत होता त्या महाविद्यालयात शिकत होती.

कॉलेजमध्ये भेटल्यानंतर राजीव आणि लुई प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी दोघांनी खगरिया गाठले आणि मोठ्या थाटामाटात लग्न केले.

लग्नादरम्यान चीनमधील तरूणी लुई डॅनने पतीसोबत जोरदार डान्स केला. दोघांनीही विवाह सोहळ्याचे सात फेरे पूर्ण विधीपूर्वक पूर्ण केले.