Bihar Election 2020 : भाजपानंतर जदयूचाही जाहीरनामा, तरुणाई अन् रोजगाराला प्राधान्य
By महेश गलांडे | Updated: October 22, 2020 16:54 IST2020-10-22T16:40:23+5:302020-10-22T16:54:18+5:30

कोरोना महामारीच्या संकटात बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपा जेडीयू याठिकाणी एकत्र निवडणूक लढवत आहेत.
भाजपाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला असून यात मुख्य म्हणजे कोरोनाचा महामारीचाही उल्लेख करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पाटण्यात भाजपाने संकल्प पत्र प्रसिद्ध केलं आहे.
भाजपाच्या जाहीरनाम्यात भाजपाने ११ मोठे संकल्प केले आणि सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. “भाजपा है तो भरोसा है’ ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प' यासह भाजपाने नवीन नाराही दिला आहे.
कोरोनाची ही लस बिहारच्या लोकांना मोफत दिली जाईल असं आश्वासन भाजपानं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. यावरुन इतर राज्यातील नेत्यांनी भाजपाला लक्ष्य केलंय. तसेच, नागरिकांनाही नाराजी वर्तवली आहे.
भाजपानंतर, जनता दल युनायटेडनेही प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायणसिंह, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासमवेत इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला.
जनता दल युनायटेडने आपल्या जाहीरनाम्यात 7 सुत्री कार्यक्रम 2 ची घोषणा केली आहे. त्यामध्ये तरुणाईवर भर देण्यात आला असून रोजगार निर्मित्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे.
जदयूच्या जाहीरनाम्यातील 7 महत्त्वाच्या घोषणांमध्ये, आर्थिक हल युवाओं को बल हा एक नारा आहे. तर, युवा शक्ति बिहार की प्रगती हा दुसरा नारा आहे.
आरक्षित रोजगार महिलाओं को रोजगार, हर घर बिजली, हर खेत के लिए सिंचाई... याही घोषणा करण्यात आल्या आहेत.
हर घऱ नल का स्वच्छ गांव, समृद्ध गांव... तसेच घर तक पक्की गली नालियाँ, विकसित शहर... अशीही घोषणा आहे.
अवसर बढे आगे पढे, सबके लिए स्वास्थ सुविधा.... हा एक नारा जदयूच्या जाहीरनाम्यात देण्यात आला आहे.
जदयूने आपल्या जाहीरनाम्यात तरुणाई आणि रोजगाराला प्राधान्य दिलं आहे, निश्चय पुरे होते वादे.. अब नये इरादे... असं घोषवाक्य जदयूच्या जाहीरनाम्यावर आहे
जदयूप्रमाणेच भाजपानेही आपल्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केला आहे. मेडिकल अन् इंजिनिअरिंगचं शिक्षण हिंदीत उपलब्ध करुन देणार असंही म्हटलंय