माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:17 IST2025-04-14T09:50:34+5:302025-04-14T10:17:32+5:30

Dr. Babasaheb Ambedkar Quotes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक विचार लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत असतात. असेच काही विचार आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Dr.Babasaheb Ambedkar Quotes : आज १४ एप्रिल म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti). बाबासाहेबांचे अनेक विचार आजही लोकांच्या जीवनाचा भाग आहेत. त्यांने अनेक विचार लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत असतात. असेच काही विचार आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा! - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मोठ्या गोष्टीनं आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

काम लवकर करायचं असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपण सर्वातआधी आणि शेवटी भारतीय आहोत - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जीवन लांब असण्यापेक्षा ते महान असावं - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी अशा धर्माला मानतो जो धर्म स्वतंत्रता, समानता आणि बंधुता मानतो - डॉ. बाबासाहेब आंबेडकर