चंद्रयान ३ मधील आणखी एक Good News; बरीच वर्ष प्रोपल्शन मॉड्यूल काम करू शकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 09:28 PM2023-08-20T21:28:12+5:302023-08-20T21:31:11+5:30

इस्रोची(ISRO) चंद्रयान-३ मून मिशन आता अतिशय रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. चंद्रयान ३ चा विक्रम लँडरला तीन दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाभोवती उतरायचे आहे. तीन दिवसांपूर्वी तो त्याच्या सारथीपासून म्हणजेच प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळा झाला. १७ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रयान-३ चे दोन भाग वेगळे झाले.

प्रोपल्शन मॉड्यूल सोडून विक्रम लँडर पुढे जात आहे. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ विनोद कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, जेव्हा चंद्रयान-३ लाँच करण्यात आले. तेव्हा प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये १६९४.४ किलो इंधन होते. यानंतर, प्रोपल्शन मॉड्यूलच्या मदतीने पाच वेळा पृथ्वीभोवती कक्षा बदलण्यात आली. इंजिन सहा वेळा सुरू झाले.

चंद्रयान-३ चंद्राच्या महामार्गावर गेलं. ट्रान्स-लूनर ट्रेजेक्टरीत पोहोचले. मग चंद्राच्या चारही दिशांना मॉड्यूलचे इंजिन सहा वेळा चालू केले. एकूण १५४६ किलो इंधनाचा वापर झाला. प्रोपल्शन मॉड्यूलचे थ्रस्टर पृथ्वीभोवती पाच वेळा चालू केले गेले. तेव्हा ७९३ किलो इंधन वापरण्यात आले

चंद्राभोवतीची पाच वेळा प्रदक्षिणेचा वेग कमी करण्यासाठी थ्रस्टर म्हणजेच इंजिन चालू करण्यात आले. तेव्हा ७५३ किलो इंधन वापरण्यात आले. एकूण इंधनाचा वापर १५४६ किलो होता. आता १५० किलो इंधन शिल्लक आहे. म्हणजेच ते केवळ ३ ते ६ महिने चालणार नाही. उलट ते अनेक वर्षे काम करू शकते.

याला इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक आहे. म्हणजेच, जर सर्वकाही सुरळीत झाले आणि कोणतीही समस्या नसेल, तर प्रोपल्शन मॉड्यूल बऱ्याच वर्षांपासून कार्य करू शकते. हे सर्व चंद्राभोवतीच्या कक्षा सुधारण्यावर अवलंबून असते.

तुम्ही फक्त विचार करा... चंद्रयान-२ चे ऑर्बिटर अजूनही काम करत आहे. त्यामुळे चंद्रयान-३ च्या प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये भरपूर इंधन शिल्लक आहे. हे किती वर्ष चालणार? जर सर्व काही ठीक झाले तर प्रोपल्शन मॉड्यूल चार-पाच वर्षांपेक्षा जास्त काळ काम करू शकेल असं इस्रोचे शास्त्रज्ञ गृहीत धरत आहेत.

विक्रम लँडर आता चंद्रापासून केवळ २५ किलोमीटर दूर आहे. चंद्रयान-३ च्या विक्रम लँडरने १७ ऑगस्ट २०२३ रोजी प्रोपल्शन मॉड्यूल सोडले. तो स्वतः पुढे चालत होता. दुसरा मार्ग धरला. या मार्गाने तो चंद्राच्या जवळ पोहोचला आहे. १८ ऑगस्टच्या दुपारपूर्वी, विक्रम लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल 153 किमी x 163 किमीच्या कक्षेत होते. मात्र ४ वाजण्याच्या सुमारास दोघांचे मार्ग बदलले.

यानंतर विक्रम लँडर 113 किमी x 157 किमीच्या कक्षेत आले. तेव्हा त्याचे अंतर चंद्राच्या भूमीपासून फक्त ११३ किलोमीटर बाकी होते. याचा अर्थ विक्रम ११३ किमी पेरिल्यून आणि १५७ किमी अपोलोनमध्ये होता. पेरील्युन म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून कमी अंतर. अपोलोन म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून अधिक अंतर.

मागील महिन्यात भारताने चंद्रयान-३ लॉन्च केले. यशस्वी लॉन्चिंगनंतर आता चंद्रावर लँड करण्याची सर्वजण प्रतिक्षा करत आहेत. या दरम्यान, रशियासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियाने ५० वर्षांनंतर दुसऱ्यांदा चंद्र मोहीम सुरू केली होती.

२१ ऑगस्ट रोजी रशियाचे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. पण, आता रशियाचे यान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. Luna-25 यानाशी संपर्क तुटला आहे. त्यातच भारतासाठीही २३ ऑगस्टपर्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.