शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aeroplane Black Box: 'ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय? विमान अपघातानंतर सर्वात आधी का शोधतात याला – जाणून घ्या नेमकं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:37 IST

1 / 7
जेव्हा एखादे विमान कुठेही कोसळते, तेव्हा प्रथम अपघाताचे कारण शोधले जाते. विमान अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक प्रशासन, सुरक्षा दल आणि अग्निशमन विभागासारख्या आपत्कालीन सेवा तेथे पोहोचतात. विमान अपघातानंतर, त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी ब्लॅक बॉक्स ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू ठरते.
2 / 7
विमान अपघातानंतर, त्याची चौकशी करण्यासाठी एक विशेष प्रशिक्षित हवाई अपघात तपास पथक तयार केले जाते. जे ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम देखील करते. भारतात, या पथकांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान अपघात तपास ब्युरो पाठवतात.
3 / 7
आता हा प्रश्न अनेकांच्या मनात येईल की, जेव्हा विमान अपघातात संपूर्ण विमान नष्ट होते, तर ब्लॅक बॉक्स कसा वाचतो? अपघात कितीही मोठा असला तरी, ब्लॅक बॉक्सला काहीही होत नाही, कारण तो टायटॅनियमपासून बनलेला असतो आणि अपघातादरम्यानही तो सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी तो एका मजबूत बॉक्समध्ये ठेवला जातो.
4 / 7
ब्लॅक बॉक्स हे एक मजबूत आणि दाब प्रतिरोधक उपकरण आहे, ज्याचे काम उड्डाणादरम्यान विमानाच्या हालचाली रेकॉर्ड करणे आहे. ही एक डिजिटल डायरी आहे, जी विमानात बसवली जाते आणि त्यात बरीच माहिती साठवली जाते आणि जर अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सापडला तर, त्यातून अपघाताची संपूर्ण माहिती मिळू शकते.
5 / 7
जो कोणी पहिल्यांदा ब्लॅक बॉक्स हा शब्द ऐकत असेल, त्याला हा बॉक्स काळ्या रंगाचा असावा असे वाटेल. पण प्रत्यक्षात तो काळ्या रंगाचा नसतो. ब्लॅक बॉक्स हा चमकदार केशरी रंगाचा असतो, जेणेकरून तो सहज शोधत येऊ शकतो.
6 / 7
ब्लॅक बॉक्समध्ये दोन महत्त्वाचे भाग असतात, एकामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) असतो, जो विमानाच्या उड्डाणादरम्यान होणारी सर्व तांत्रिक माहिती जसे की वेग, उंची, दिशा, इंधन पातळी आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) सह इतर माहिती रेकॉर्ड करतो. या सोबतच तो पायलट आणि सह-पायलटमधील संभाषण देखील रेकॉर्ड करतो.
7 / 7
ब्लॅक बॉक्समध्ये एक मेमरी चिप असते आणि सर्व डेटा त्यात साठवला जातो. यात डेटा सतत रेकॉर्ड केला जातो आणि काही काळानंतर जुना डेटा नवीन डेटाने ओव्हरराईट केला जातो.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमानDeathमृत्यू