रस्त्यावर काळोख,धुक्याचा कहर! यमुना एक्स्प्रेस-वेवर 22 गाड्यांचा विचित्र अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 19:06 IST2017-11-08T18:55:31+5:302017-11-08T19:06:29+5:30

उत्तर भारतात गेल्या एका आठवड्यापासून थंडी जोर धरत असून धुकं पडायला सुरूवात झाली आहे.
थंडीची सुरूवात होताच दाट धुक्याचा कहर मथुरा महामार्गावर पाहायला मिळाला आहे.
आज अचानक दाट धुकं आणि त्यामुळे झालेला काळोख यामुळे यमुना महामार्गावर तब्बल 22 पेक्षा जास्त गाड्या एकमेकांना धडकल्या.
या भागात दाट धुकं आणि रस्त्यावरील अंधार यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली असताना मागून येणाऱ्या एका गाडीने समोरच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर पाठोपाठ येणारी वाहनंही समोरचं काहीही दिसत नसल्याने पुढच्या वाहनांवर धडकली.
या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघातानंतर बराच वेळ वाहतूक खोळंबली होती पण घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि यमुना एक्सप्रेसवेच्या कर्मचा-यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.