शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शोध पाण्याचा, संघर्ष जगण्याचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 3:04 PM

1 / 4
आग ओकणारा सूर्य, त्यामुळे अंगाची होणारी लाहीलाही.. मात्र अशा परिस्थितीतही नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळमधील महिलांची पाण्यासाठीची वणवण काही केल्या संपत नाही. या भागातील महिलांना तर रात्रीही पाण्यासाठी पायपीट करावी लागते. (सर्व छायाचित्रे- प्रशांत खरोटे)
2 / 4
म्हैसमाळमधील महिला दिवस-रात्र पाण्यासाठी भटकंती करतात. रात्रीच्या मिट्ट अंधारात बॅटरीच्या मदतीनं शक्य तिथून शक्य तितकं पाणी आणून कुटुंबाची तहान भागवतात.
3 / 4
पाण्याला जीवन म्हटलं जातं. मात्र म्हैसमाळमधील महिला पाण्यासाठी जीवावरच उदार झाल्या आहेत.
4 / 4
रात्रीच्या अंधारात, बॅटरीच्या मदतीनं मिळेल तेवढ्या प्रकाशात तळ गाठलेल्या विहिरीतून पाणी काढण्याची कसरत इथल्या महिलांना कित्येक वर्षांपासून करावी लागतेय.
टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक