नाशिक दौ-यात राज ठाकरेंनी जमिनीवर बसून साधला कार्यकर्त्यांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 14:33 IST2017-11-10T14:29:28+5:302017-11-10T14:33:17+5:30

पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असून यासाठी त्यांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे साधारण आठ महिन्यानंतर राज ठाकरे नाशिकच्या दौ-यावर आले आहेत. राज ठाकरे यांनी जमिनीवर बसूनच कार्यकर्त्यांशी संवाद साधणं पसंद केलं.

मुंबईत सातपैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राज ठाकरेंनी पक्षबांधणीसाठी जोमाने प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. याचाच भाग म्हणून राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांची भेट घेत आहेत. दरम्यान नाशिक दौ-यावर असताना राज ठाकरे यांनी थेट जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाला बळ देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु केले असून, कार्यकर्ते आणि पदाधिका-यांशी संवाद साधताना दिसत आहेत.

राज ठाकरेंनी यावेळी समृद्धी महामार्गबाधित शेतक-यांची भेट घेऊन चर्चा केली. कल्याण, शहापूर, इगतपुरीच्या शेतक-यांनी शासकीय विश्रामगृहात येऊन त्यांची भेट घेतली.

उपस्थित शेतक-यांना यावेळी राज ठाकरेंना कॅमे-यात कैद करण्याचा मोह आवरता आला नाही.