... म्हणून मी लग्न करणार, लग्नाच्या चर्चेवर धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 07:24 PM2023-01-25T19:24:42+5:302023-01-25T19:35:21+5:30

दिव्यदृष्टीने पाहिजे त्या गोष्टी ओळखतो, असा दावा करणारे बागेश्वर बाबा सध्या भलतेच चर्चेत आहेत. बागेश्वर बाबा यांना नागपूरमध्ये येऊन दरबार भरवला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हानच दिले.

दिव्यदृष्टीने पाहिजे त्या गोष्टी ओळखतो, असा दावा करणारे बागेश्वर बाबा सध्या भलतेच चर्चेत आहेत. बागेश्वर बाबा यांना नागपूरमध्ये येऊन दरबार भरवला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हानच दिले.

अंनिसच्या आव्हानानंतर आपली वक्तव्ये आणि चमत्कारांचे कथित दावे प्रकरणामुळे चर्चेत आलेले बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या लग्नाचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. मात्र, धीरेंद्र शास्त्रींनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

कथावाचक आणि मोटीव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांच्यासोबत धीरेंद्र शर्मा हे लग्न करणार आहेत, या दोघांचे मिम्सही व्हायरल होत आहेत. त्यावरुन, ह्या चर्चांना उधाण आले होते. पण, बाबांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

माझ्या लग्नाबाबत पसरलेली अफवा केवळ मिथ्या आणि चूक आहे. सध्यातरी लग्नाचा विचार माझ्या मनात नाही. पण जेव्हा केव्हा मी लग्न करेल, तेव्हा ते वाजतगाजत करेल.

धीरेंद्र शास्त्री यांना अविवाहित राहायचे नाही, असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. पुढे जाऊन माझ्या चरित्र्यावर संशय घेतला जाऊ नये, म्हणून मी लग्न करणार आहे. पण, सध्यातरी याबाबत विचार केलेला नाही.

माझ्या लग्नाबाबत माझे आई-वडिल आणि गुरुजीच ठरवतील, मला बालाजींची आज्ञा घ्यावी लागेल. ती आज्ञा मी घेतली आहे. त्यामुळे, मी लग्न करेल तेव्हा वाजत गाजत करेल, असे धीरेंद्र शर्मांनी सांगितले.

बागेश्वर बाबांचा जन्म ४ जुलै १९९६ मध्ये झाला. छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर बाबांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव सरोज गर्ग आहे.

धीरेंद्र शर्मा यांचं मूळ गावी बागेश्वर धाम आहे, जिथे त्यांचा दरबार भरतो. त्यासाठी, अनेक गावखेड्यातून भाविक दर्शनाला येतात. २७ वर्षीय धीरेंद्र शास्त्री म्हणतात माझ्या लग्नाबाबत माझे पालक निर्णय घेतील.

दरम्यान, कथावाचक जया किशोरी या सोशल मीडियावर चागंल्याच प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ इन्टाग्राम आणि युट्यूबवर व्हायरल होत असतात. अध्यात्मिक कथा वाचणाऱ्या जया किशोरी तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.

जया किशोरी यांनीही आपल्या लग्नाबाबत एक अट असल्याचे म्हटले. लग्नानंतर जो व्यक्ती माझ्या आई-वडिलांना माझ्यासोबत घेईल, त्या व्यक्तीशी मी लग्न करेल, असे जया किशोरी यांनी एका प्रश्नावर बोलताना म्हटले.