ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 20:23 IST2026-01-13T20:17:06+5:302026-01-13T20:23:30+5:30

ZP Panchayat Samiti Election: जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ग्रामीण राजकारण ढवळून निघणार आहे. आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक खर्चाची मर्यादाही जाहीर केली आहे.

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याबरोबरच राज्य निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादाही जाहीर केली आहे.

७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी ९ लाख आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी ६ लाख रुपये खर्च मर्यादा असणार आहे.

६१ ते ७० निवडणूक विभाग असेल्या जिल्हा परिषदांसाठी ७ लाख ५० हजार आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी ५ लाख २५ हजार रुपये खर्च मर्यादा असणार आहे.

५० ते ६० निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी ६ लाख आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपये खर्च मर्यादा असणार आहे.

एकूण १२ जिल्हा परिषदांमध्ये ७३१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात महिलांसाठी ३६९ जागा असणार आहेत. तर अनुसूचित जातींसाठी ८३ जागा राखीव आहेत. या निवडणुकींमध्ये अनुसूचित जमातींसाठी २५ जागा, पुरुष मागासवर्ग प्रवर्गासाठी १९१ जागा राखीव आहेत.

राज्यातील एकूण १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत असून, एकूण १,४६२ जागा आहेत. यात महिलांसाठी ७३१ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी १६६ जागा, अनुसूचित जमातींसाठी ३८ जागा आणि पुरुष मागासवर्ग प्रवर्गासाठी ३४२ जागा राखीव आहेत.