By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:06 IST
1 / 6हवेत मिसळणारे घातक घटक - हवेत कारखाने व वाहनांमुळे कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स, वीज केंद्र व सिमेंट कंपन्यांमधून सल्फर डायऑक्साइड, कुजलेला कचरा, सांडपाणी, पशुपालन व हरितगृहातून मिथेन, अमोनिया, ओझोन तसेच बांधकामांमुळे सिमेंट, प्लास्टर ऑफ पॅरिस, घरांच्या भिंतींना लावले जाणारे पेंट, माती, फ्लाय अॅश व सिमेंटपासून तयार केलेल्या विटा या सर्वांचे सूक्ष्म कण मिसळतात.2 / 6सिमेंट, पीओपी आणि पेंटमधील घटक - सिमेंटमधील चुना, सिलिका, अॅल्युमिना, आयर्न ऑक्साइड, मॅग्नेशिया, जिप्सम, सल्फर ट्रायऑक्साइड, अल्कली, ट्रायकॅल्शियम सिलिकेट, डायकेल्शियम सिलिकेट, ट्रायकॅल्शियम अॅल्युमिनेट, टेट्राकॅल्शियम अॅल्युमिनोफेराइट, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मधील जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट, कॅल्शियम सल्फेट, पेंटमधील टायटॅनियम डायऑक्साइड, आयर्न ऑक्साइड, क्रोमियम ऑक्साइड, मेटल ऑक्साइड्स, कॅल्शियम कार्बोनेट, टॅल्क, चिकणमाती, प्लास्टिक किंवा पॉलिमर, अॅक्रेलिक किंवा विनाइल रेझिन, नैसर्गिक तेल किंवा सिंथेटिक अल्किड्स, सॉल्व्हेंट, थिनर किंवा स्पिरिट, टर्पेटाइन किंवा मिनरल स्पिरिट्स, बुरशीरोधक घटक, अँटि-स्पॅटर आदींचे सूक्ष्म कण हवेत मिसळतात.3 / 6मानवी आरोग्यावर होणारे परिणाम - हवेत मिसळलेले घातक वायू व धूलिकण फुप्फुसांत गेल्यास अस्थमा, ब्रॉन्कायटिस, सीओपीडी, फायब्रोसिस, सिलिकोसिस, कॅन्सर, या दीर्घकालीन व घातक आजारांसह सर्दी-खोकला आदी परिणाम जाणवतात. कार्बन मोनोऑक्साइड रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करत असल्याने हार्ट अटॅक येणे, लहान मुलांच्या मेंदू व मज्जासंस्थेवर परिणाम होत असल्याने त्यांच्या मानसिक विकासावर वाईट परिणाम होतात.4 / 6पशुपक्षी व झाडांवरील परिणाम - पक्ष्यांची श्वसनसंस्था मानवापेक्षा अधिक संवेदनशील असते, त्यामुळे त्यांना या प्रदूषणाचा फटका लवकर बसतो. त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. हवेतील धुरामुळे त्यांची दिशा ओळखण्याची क्षमता व अन्नसाखळी विस्कळीत होते. हे धूलिकण पानांवर बसत असल्याने झाडांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते व त्यांच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. पानांच्या कडा जळतात. मातीचा पीएच बदलत असल्याने त्यांची वाढ खुंटते. झाडे कमकुवत होऊन हळूहळू सुकायला सुरुवात होते.5 / 6प्रतिबंधात्मक उपाय - बांधकाम क्षेत्र व रहदारीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. बाहेरून आल्यावर हात-पाय व डोळे स्वच्छ धुवावेत. व्हिटॅमिन-सी युक्त आहार घ्यावा. पक्ष्यांसाठी ठेवलेली पाण्याची भांडी रोज स्वच्छ करावीत. पाळीव प्राणी व पक्ष्यांचा निवारा बांधकाम क्षेत्र, कारखाने व रहदारीच्या ठिकाणांपासून दूर ठेवावे. दाट पाने असलेल्या झाडांची लागवड करावी.6 / 6फ्लाय अॅश व विटांमधील घटक - फ्लाय अॅश व त्यापासून तयार केलेल्या विटांमधील सिलिका, अॅल्युमिना, आयर्न ऑक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड, पोटॅशियम, सोडियम ऑक्साइड, आर्यन, कॅल्शियम ऑक्साइड, आर्सेनिक, शिसे तसेच मातीच्या विटांमधील सिलिका, अॅल्युमिना, चुना, आयर्न ऑक्साइड, मॅग्नेशिया आदी घटक हवेत मिसळतात.