By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 19:49 IST
1 / 6५ लाख रुपयांपेक्षा जास्तीचा खर्चही होणार : या योजनांतर्गत साधारण ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होते. मात्र, आता अवयव प्रत्यारोपणासारख्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी लागणारा अतिरिक्त खर्च राज्य सरकारच्या राखीव निधीतून दिला जाणार आहे.2 / 6या दुर्मीळ व प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश : यामध्ये यकृत (लिव्हर), मूत्रपिंड (किडनी), हृदय (हार्ट), फुफ्फुस (लंग) यांसारख्या अवयव प्रत्यारोपणासह काही दुर्मीळ आजारांवरील उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.3 / 6या रुग्णांना दिलासा मिळणार : अत्यंत खर्चिक उपचार परवडत नसल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत होते. या निर्णयामुळे गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.4 / 6निकष आणि अटी काय? : रेशन कार्ड असणे आवश्यक, नोंदणीकृत अधिकृत रुग्णालयातच मिळणार उपचार, योजनेत नोंदणी करणे आवश्यक तसेच प्रत्यारोपणासाठी तज्ज्ञ समितीची मान्यता आवश्यक आहे.5 / 6ही कागदपत्रे हवीत : आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र वैद्यकीय अहवाल व डॉक्टरांचे प्रमाणपत्र या योजनेचा लाभघेण्यासाठी आवश्यक आहे.6 / 6अशी आहे अर्ज प्रक्रिया : महात्मा फुले/आयुष्मान योजनेत नोंदणी करणे आवश्यक आहे, शासकीय किंवा अधिकृत रुग्णालयात तपासणी, आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यानंतर समितीकडून मंजुरीनंतर उपचारास सुरुवात केली जाते.