"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:28 IST2025-07-18T15:29:42+5:302025-07-18T16:28:49+5:30

एकीकडे विधानभवनातील गदारोळाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादामुळे विधानसभेत कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

एकीकडे याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच 'लगाव बत्ती' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.

या मुलाखतीत त्यांनी "जितेंद्र आव्हाड राजकारणाच्या बाहेर पडले तर मला आवडेल", असं विधान केलं आहे.

"सध्याचं राजकारण हे फक्त गोंधळापुरतंच मर्यादित राहिलंय. सगळ्या सभागृहांमध्ये सध्या फक्त गोंधळ होतो. एक नागरिक म्हणून माझ्या हिताचं काही बोललं जातं का?"

"आव्हाड खूप पुढे गेलेत. त्यांनी हे चक्रव्यूह भेदलं आहे. पण तरीही ते बाहेर पडले तर मला खूप आवडेल", असं ऋता आव्हाड म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, "मला स्वत:ला हा खूप तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. असे बरेच इन्सिडंट होतात किंवा असे बरेच लोक समोर असतात ज्यांच्याबरोबर समोर बसणं नव्हे तर त्यांच्याशी असोसिएट होणं देखील मला आवडलं नसतं".

"पण माझ्यावर हे कंम्पल्शन आहे की मी त्यांना काही बोलू शकत नाही. ही घुसमट जो त्याच्यातून जात असतो त्यालाच कळते".

"मी नेहमी सांगते की तुम्ही छान सुंदर बूट घातलाय तो मला समोरुन खूप छान वाटतोय. पण ते घालून तुम्हाला कुठे शू बाईट होतात ते तुम्हीच सांगू शकता. मुकुट हा नेहमी काटेरी असतो", असंही त्या पुढे म्हणाल्या.