...ती अफवा पसरली आणि नागपुरात दंगल भडकली, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी, दाहकता दाखवणारे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:36 IST2025-03-18T11:33:28+5:302025-03-18T11:36:47+5:30

Nagpur Violence: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण संवेदनशील बनलेलं असतानाच सोमवारी रात्री नागपूरमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण संवेदनशील बनलेलं असतानाच सोमवारी रात्री नागपूरमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली.

मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार नागपूरमध्ये पसरलेल्या एका अफवेमुळे ही दंगल भडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर हिंसक जमावाने मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोड केली. यादरम्यान, काही घरे, दुकाने आणि वाहनांना लक्ष्य करण्यात आले.

नागपूरमध्ये धर्मग्रंथ जाळण्यात आल्याची अफवा पसरल्यानंतर जमाव संतप्त झाला होता. या जमावाने शहरातील काही भागात जाळपोळ करण्यास सुरुवात केली. तसेच या जमावाने पोलिसांच्या दिशेनेही तुफान दगडफेक केली. यात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भंडारा रोडजवळ हंसपुरी परिसरात रात्री १० ते ११ दरम्यान, पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला होता. तसेच यावेळी हिंसक जमावाने अनेक वाहनांची जाळपोळ केली. तसेच परिसरातील घरं आणि दवाखान्यावरही हल्ला केला. यावेळी हिंसक जमावाकडून ज्या वाहनांमध्ये देवी देवतांच्या मूर्ती होत्या, त्यांना विशेष लक्ष्य करण्यात आले.

दरम्यान, या दंगली प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतलं आहे. एवढंच नाही तर या हिंसाचारात सुमारे २५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

नागपूरमधील महाल परिसरामध्ये दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांनंतर नागपूरमधील काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी १८ मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.