Maharashtra Day 2022 : अभिमानास्पद! महर्षी धोंडो केशव कर्वे ते सचिन तेंडुलकर; 'हे' आहेत महाराष्ट्रातील भारतरत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 02:30 PM2022-05-01T14:30:02+5:302022-05-01T15:02:16+5:30

उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तीमत्वांसमोर आपोआपच माथा आदराने झुकतो.

साधुसंतांची, वीर लढवय्यांची भूमी असलेला महाराष्ट्र ही गुणवंताची खाण आहे, याची खात्री भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालेल्या यादीवरून लक्षात येते. उत्तुंग कार्य केलेल्या या व्यक्तीमत्वांसमोर आपोआपच माथा आदराने झुकतो.

जेष्ठ शिक्षणप्रसारक व समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे १९५८ साली या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती.

हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र या खंडात्मक ग्रंथाचे लेखक महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे १९६३ साली या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित.

भूदान चळवळींचे जनक व समाजसुधारक आचार्य विनोबा भावे यांना १९८३ साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९९० मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ख्यातकीर्त पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा २००१ साली या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

विख्यात शास्त्रीय गायक भीमसेन जोशी यांना २००८ रोजी भारतरत्न प्राप्त झाला.

प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रिकेटचा देव अशी उपमा मिळालेले सचिन तेंडुलकर यांना २०१४ रोजी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.