Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:49 IST2025-09-27T16:38:44+5:302025-09-27T16:49:04+5:30
Laxman Hake Latest News: सभेसाठी जात असताना लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. हाके सहकाऱ्यांसह जात असताना ही घटना घडली.

पाथर्डी येथे आयोजित केलेल्या सभेला जात असताना लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यात गाडीतील लोक सुदैवाने वाचले.
लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, ते दौंडमार्गे आम्ही नगर बायपासने पाथर्डीकडे जात होते. बायपासवर वळणार होतो. तिथे सारंगी नावाचं हॉटेल आहे. तिथेच ही घटना घडली.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांच्या दोन गाड्या सोबत असताना हा हल्ला करण्यात आला. आठ ते दहा लोकांनी गाडीवर लाठ्यानी हल्ला केला.
हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी दोन पोलिसांच्या गाड्या होत्या. दहा-बारा पोलीस अधिकारी, कर्मचारी होते. पोलिसांना न घाबरता आठ-दहा लोकांनी बाबूंने गाडीवर हल्ला केला.
अहिल्यानगर जिल्ह्यात घडलेल्या घटनेनंतर हाके पुढे सभेसाठी रवाना झाले. त्यांनी जीव जाईपर्यंत आपण ओबीसींसाठी लढत राहणार असल्याचे सांगितले.