भारत- पाक युध्दात बजावलेली महत्त्वाची भूमिका...पाहा नाशिकला आलेले डकोटा विमान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 08:58 PM2019-02-08T20:58:29+5:302019-02-08T21:37:32+5:30

भारतीय वायुसेनेत डकोटा हे मालवाहू विमान 1930 मध्ये दाखल झाले होते.

दुसऱ्या महायुद्धात कामगिरी बजावल्यानंतर 1947 मध्ये भारत पाक युध्दात लडाख आणि उत्तर पूर्व भागात या डकोटा विमानाने महत्त्व पूर्ण कामगिरी बजावली होती.

दुसऱ्या महायुद्धात या विमानातून जवान आणि शस्र वाहतूक करण्यात आली होती.

इंग्लंडनिर्मित या विमानाचा वापर गेल्या काही वर्षांपासून बंद होता.

मात्र हवाई दलाने या विमानाचे आधुनिकीकरण केले असून दिनांक 20 ते 24 फेब्रुवारी मध्ये बेंगलोर येथे होणाऱ्या एयर शोमध्ये सहभागी होणार आहे.