शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युतीचे हे दिग्गज जिंकले असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाला असता 'भोपळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 3:40 PM

1 / 7
अमरावती लोकसभा मतदारसंघ - आघाडी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांनी 5 लाख 7 हजार 844 मते घेत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांचा पराभव केला.
2 / 7
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ - एमआयएमचे एम्तियाज जलील यांनी 3 लाख 88 हजार 784 मते घेत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव केला.
3 / 7
बारामती लोकसभा मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी 6 लाख 83 हजार 705 मते घेऊन भाजपाच्या कांचन कुल यांचा पराभव केला.
4 / 7
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ - काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांनी 5 लाख 57 हजार 550 मते घेत भाजपाचे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज आहिर यांचा पराभव केला.
5 / 7
रायगड लोकसभा मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी 4 लाख 84 हजार 563 मते घेत शिवसेनेचे केंद्रीय मत्री अनंत गीते यांचा पराभव केला.
6 / 7
सातारा लोकसभा मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयनराजे भोसले यांनी 5 लाख 76 हजार 78 मते घेत शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा पराभव केला.
7 / 7
शिरुर लोकसभा मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी 6 लाख 34 हजार 554 मते घेत शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला.
टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस