गुड न्यूज! राज्यात ४८ तासात एकही पोलीस कोरोनाबाधित आढळला नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 10:29 PM2020-06-09T22:29:34+5:302020-06-09T22:45:11+5:30

गेले अडीज महिने कोरोनाने थैमान घातले असून कोरोना योद्धा असलेल्या पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी नागरिकांच्या जीवाची काळजी घेतली आहे.

राज्यातील १ हजार ४३१ पोलिस हे सध्या कोरोनाबाधित झाले असले तरी आंनदाची बाब म्हणजे मागच्या ४८ तासात पोलिस दलात एक ही कोरोनाने संक्रमित पोलिस सापडलेला नाही.

विशेषत: मागील ४८ तासात ६६ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याचे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. तसेच खंत म्हणजे या महामारीने आतापर्यंत ३४ जणांचा बळी घेतला आहे.

राज्यात १ हजार ४३१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील हजारो पोलिसांना आणि कुटुंबियांना सध्या क्वारंटाइन करून ठेवले आहे. या महामारीने ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

त्यातच ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढला आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने पोलिसांची डोकेदुखी ही वाढली होती. कधी वादळ तर मुसळधार पाऊस या ना त्या कारणाने पोलिसांच्या समस्या वाढतच असून संपण्याचे नाव घेत नव्हत्या, त्यामुळेच पोलिसांच्या या समस्या जाणून त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठीच पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आज्ञांकित कक्ष सुरु करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोली स दलातील १९५  अधिकारी व १२३६  पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित पोलिसांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्या पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोनाबाधित पोलिसांच्या आकडेवारीत कमालीची वाढ होत होती.

मात्र,सध्या त्यात घट झाल्याचे पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसात खूप कमी संख्या वाढली होती. मात्र मुंबई पोलिस आयुक्तालयात आता ७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजते.  राज्याच्या आकडेवारीत ही कोरोना झालेल्यांमध्ये मुंबई पोलिसांची संख्या ही जास्त आहे. मुंबई पोलीस दलात सोमवार सायंकाळपर्यंत १०३५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर या पूर्वी नोंदवण्यात आलेल्या रुग्णांमधील ८१३ रुग्ण हे पूर्णतहा बरे झालेले आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे मागील ४८ तासात पोलीस खात्यात एकाही पोलिसाला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे.