By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:06 IST
1 / 6पित्ताशयातील खडे म्हणजे काय? - पित्ताशय हा यकृताच्या खाली असलेला एक छोटा, पिशवीसारखा अवयव आहे, जो पचनासाठी आवश्यक असलेला पित्तरस साठवण्याचे काम करतो. जेव्हा या पित्तरसात कोलेस्टेरॉल किंवा बिलीरुबिनचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा त्याचे स्फटिक बनतात आणि कालांतराने त्याचे खडे तयार होऊ लागतात.2 / 6रुग्णाला जाणवतो असा त्रास... - पोटाच्या वरच्या भागात किंवा उजव्या बरगडीखाली अचानक आणि तीव्र वेदना होणे, या वेदना पाठीकडे किंवा उजव्या खांद्यामध्ये पसरणे, मळमळ आणि उलट्यांचा त्रास होणे, सतत अॅसिडिटी, अपचन किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे व संसर्ग झाल्यास थंडी वाजून ताप येणे.3 / 6चाळिशीतील महिलांत जास्त प्रमाण - महिलांमध्ये असलेल्या 'इस्ट्रोजेन' हार्मोनमुळे पित्ताशयाची हालचाल मंदावते आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे चाळिशीतील, लठ्ठपणा असलेल्या आणि अनेकदा गरोदर राहिलेल्या महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आढळते.4 / 6कशामुळे होतात पित्ताशयात खडे? - आहारात तेलकट, तुपकट, जंक फूडचे प्रमाण जास्त आणि पालेभाज्या/फळांचे (फायबर) प्रमाण कमी असणे, लठ्ठपणामुळे क्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढ होते, जे खडे तयार होण्यास कारणीभूत ठरते. अत्यंत वेगाने वजन कमी केल्यास यकृत जास्त कोलेस्टेरॉल तयार करते. इतर कारणांमध्ये आनुवंशिकता, मधुमेह किंवा जास्त वेळ उपाशी राहण्याची सवय हेसुद्धा कारण आहे.5 / 6दुर्लक्ष केल्यास या आजारांचा धोका - या त्रासाला सामान्य अॅसिडिटी समजून अंगावर काढल्यास पित्ताशयाला सूज येऊ शकते. तसेच हे खडे पित्तनलिकेत अडकल्यास कावीळ होऊ शकते. खडा स्वादुपिंडाच्या नलिकेत अडकल्यास स्वादुपिंडाला सूज येण्यासारख्या अतिशय गंभीर आणि जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात.6 / 6काय काळजी घ्यावी? - आहारात हिख्या पालेभाज्या, ताजी फळे आणि तृणधान्ये (फायबर) यांचा भरपूर समावेश करा, नियमित व्यायाम करा आणि वजन आटोक्यात ठेवा, जास्त वेळ उपाशी राहू नका. जेवणाच्या वेळा पाळा, तेलकट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा, भरपूर पाणी प्या आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा.