Ranjit Disale: अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीत स्कॉलरशिप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 07:52 PM2021-04-19T19:52:52+5:302021-04-19T19:58:03+5:30

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Carlo Mazzone – Ranjit Disale)

वर्ष २०२०चा 'ग्लोबल टिचर अॅवॉर्ड' पटकावल्यानंतर, सोलापूरच्या रणजितसिंह डिसले गुरुजींवर चोहोकडून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. (Carlo Mazzone – Ranjit Disale)

यानंतर ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

'कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप' या नावाने ४०० युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार आहेत.

विद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार असून याकरिता संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. पुढील दहा वर्षे १०० मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. (italy is offering carlo mazzone ranjit disale scholarship)

ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० चे विजेते रणजितसिंह डिसले यांनी मिळालेल्या पुरस्कार रकमेतील म्हणजेच ७ कोटींपैकी अर्धी रक्कम म्हणजेच साडे तीन कोटींची रक्कम ९ देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझुने हे त्यापैकीच एक आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे.

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे.

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले. या स्कॉलरशिपसंदर्भात रणजितसिंह डिसले यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली.

पाठ्यपुस्तकातल्या प्रत्येक धडय़ाला एक स्वतंत्र ‘क्यूआर’ किंवा क्विक रिस्पॉन्स कोड दिल्यामुळे कोणालाही शाळेबाहेर कुठेही आणि केव्हाही तो धडा श्राव्य किंवा दृक्-श्राव्य माध्यमातून समजून घेणे सोपे झाले.

डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज ११ देशांतील दहा कोटीहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धती च्या माध्यमातून ते १५० हून अधिक देशातील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.