1 / 11अजित पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली. त्यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.2 / 11राष्ट्रवादीचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. नेटकरी राजकीय घडामोडीवर भाष्य करताना राजकारण्यांची खिल्ली उडवत आहेत.3 / 11अनेकांनी मतदान कार्ड विकणे आहे, असं म्हणत निवडणुकीचे महत्त्व काय उरले आहे आणि त्याची कशी थट्टा सुरू आहे हे मिश्किलपणे सांगितले. आमच्या मताला किंमत नसल्याचा सूर नेटकऱ्यांमध्ये आहे.4 / 11अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.5 / 11कालपर्यंत सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे नेते आज सत्तेत सहभागी झाल्याने अनेकांना धक्का बसला. 6 / 11नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय मंडळींची खिल्ली उडवत आहेत. काहींनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचे फोटो पोस्ट केले आहेत.7 / 11तर अजित पवार पहाटे आणि दुपारी देखील झोपू देत नसल्याचे मिश्किलपणे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अनेकांनी संजय राऊत यांच्या जुन्या व्हिडीओ व्हायरल करत त्यांची फिरकी घेतली.8 / 11काहींनी स्कॅम २०२३ असा पोस्टर झळकावून अजित दादांच्या स्वॅगचा भन्नाट उल्लेख केला. 9 / 11तसेच भविष्यात भाजप आणि कॉंग्रेस हे पक्ष देखील एकत्र आले तर नवल वाटायला नको असे अनेकांनी म्हटले आहे.10 / 11आजच्या शपथविधीवरून व्हायरल होणारे भन्नाट मीम्स नेटकऱ्यांचे मनोरंजन करत आहेत. 11 / 11आजच्या शपथविधीवरून व्हायरल होणारे भन्नाट मीम्स नेटकऱ्यांचे मनोरंजन करत आहेत.