ऑफिसमधून निघताना नक्की घ्या 'या' गोष्टींची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 15:44 IST2019-11-09T15:40:40+5:302019-11-09T15:44:42+5:30

ऑफिसमधून निघण्यापूर्वीची 10 मिनिटं अतिशय महत्त्वाची असतात. त्याचा सुयोग्य वापर केल्यास तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकतात.

उद्या तुम्हाला कोणती कामं करायची आहेत, त्याची यादी तयार करा. तुम्हाला पुढल्या दिवशी याचा खूप फायदा होईल.

ऑफिसमधून निघण्यापूर्वी तुमचा डेस्क व्यवस्थित करा. डेस्कटॉप, लॅपटॉपवरील अनावश्यक फाईल्स डिलीट करा. यामुळे दुसऱ्या दिवशी तुमचा वेळ वाया जाणार नाही.

दिवसभरात तुम्हाला मोलाचं सहकार्य करणाऱ्यांचे ऑफिसमधून निघताना आभार माना. त्यामुळे त्यांच्यासोबतचे तुमचे संबंध आणखी चांगले होतील.

दिवसभरात तुम्ही केलेल्या कामाची समीक्षा करा. त्यात काही त्रुटी जाणवल्यास दुसऱ्या दिवशी त्यावर काम करा.

ऑफिसमधून निघताना घाई गडबड करू नका. त्यामुळे अनेकदा महत्त्वाची कामं राहून जातात.