गोड तिळगुळाचा असा होतो प्रवास....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 12:00 PM2022-01-06T12:00:47+5:302022-01-06T12:12:05+5:30

तिळगूळ घ्या.. गोड गाेड बोला.. म्हणत प्रत्येकाच्या मनात गोडवा निर्माण करणारा मकरसंक्रांतीचा सण आता जवळ आला आहे. पण या गोड तिळगुळालाही साखरेचा पाक आटवण्यापासून ते गोळे बांधण्यापर्यंतच्या खडतर प्रवासाला सामोरे जावे लागते. कोल्हापुरातील शुक्रवार पेठ बुरूड गल्ली येथील या तिळगूळ तयार करण्याचा प्रवास छायाचित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे ‘लोकमत’चे छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांनी..

तिळगूळ बनवण्यासाठी साखरेचा पाक एका ठरावीक प्रमाणात घट्ट होईपर्यंत आटवावा लागतो.

हा तयार पाक गोळे बनवणाऱ्या मशीनमध्ये टाकला जातो. त्यात आधीच खूप तिळगुळ असतात त्यासोबत फिरताना पाकापासून गोळे तयार होता.

तयार तिळगुळ एकमेकांपासून वेगळे होण्यासाठी ओतले जातात.

तयार झालेल्या तिळगुळाचे पॅकींग केले जाते आणि विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होते.