'ही' आहे जगातील सगळ्यात महाग चहाची किटली, किंमत इतकी की घेऊन शकाल २-३ हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:30 IST2025-08-14T12:03:16+5:302025-08-14T12:30:31+5:30

Worlds most expensive teapot: आता ही किटली कोट्यावधी रूपयांची का आहे, याची कारणं वेगवेगळी आहेत. आपल्याला सुद्धा ही कारणं जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल.

Worlds most expensive teapot: जगात अशा अनेक वस्तू आहेत ज्यांबाबत वाचलं किंवा ऐकलं तर सहजपणे विश्वास बसत नाही. आता एक कप चहाची किंमत आपल्याला माहीत असेलच. पण जगात चहाची एक किटली कोट्यावधी रूपयांची आहे.

आता ही किटली कोट्यावधी रूपयांची का आहे, याची कारणं वेगवेगळी आहेत. आपल्याला सुद्धा ही कारणं जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. चला तर पाहुयात किटली महाग असण्याची कारणं...

जगातील सगळ्यात महाग किटलीचं नाव "द इगोइस्ट" (The Egoist) आहे. ही काही साधारण किटली नाही. तर ही किटली १८ कॅरेट सोन्यापासून बनली आहे. तसेच यावर १६५८ रत्न आणि ३८६ माणिक जडलेले आहेत.

या अद्भुत किटलीची किंमत ३ मिनियन डॉलर म्हणजे जवळपास २४ कोटी रूपये इतकी आहे. आता इतक्या पैशात तर आपण रोल्स-रॉयस कार, लंडनमध्ये बंगलाही खरेदी करू शकता. या किटलीला २०१६ मध्ये सगळ्यात मौल्यवान किटलीचा किताब मिळाला होता.

ही किटली यूकेतील एन सेठिया फाउंडेशन आणि न्यूबी टीज ऑफ लंडनच्या सहयोगानं बनवण्यात आली होती. तर ही किटली इटलीचे प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर स्कावियानं डिझाइन केली होती.

किटलीमध्ये सगळीकडे हिरे जडलेले आहेत. त्यामुळे हे डिझाइन फारच मनमोहक दिसतं. याच्या सेंटरला एक मोठा ६.६७ कॅरेटचा एक माणिक आहे. तर किटलीचं हॅंडलही खास आहे. जे हत्तीच्या हातापासून बनवण्यात आलंय.

या किटलीचं नाव "द इगोइस्ट" ठेवण्यामागेही एक कारण आहे. ही किटली केवळ एक कप चहा बनवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. जे हिच्या नावातून दिसून येतं.