सौंदर्याची खूण वाटणारा तीळच तिला मृत्यूच्या दारात नेणार होता; पण नशीब बलवत्तर होतं म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 02:35 PM2020-09-16T14:35:13+5:302020-09-16T14:54:41+5:30

मुळात तीळ कॅन्सरचंही कारण ठरू शकतो. त्यामुळे शरीरावर अशाप्रकारचा एखादा नवा तीळ असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा.

स्कीनकेअर डॉट ऑर्गनुसार, हा कॅन्सरही जीवघेणा ठरू शकतो. जर वेळीच तुम्ही या कॅन्सरची ओळख पटवली नाही तर याने तुमचा जीवही जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया या कॅन्सरचे सर्वात जास्त रूग्ण आढळतात. हा कॅन्सर जास्तकरून १५ ते ३९ वर्षांच्या लोकांना आपली शिकार करतो.

सोशल मीडियावर लाइफस्टाईल ब्लॉगरने तिच्यासोबत घडलेली घटना लोकांसोबत शेअर केली. या ब्लॉगरने गेल्यावर्षी कॅन्सरमुळे वडिलांना गमावलं होतं. त्याना मेलेनोमा होता.

या ब्लॉगरचं नाव लुईस आहे आणि ती सिडनीची राहणारी आहे. तीन महिन्यांआधी लुईसला तिच्या मांडीवर एक नवा तीळ दिसला. जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तर समजलं की, ही घातक कॅन्सरची सुरूवात होती.

आपल्या इन्स्टाग्रामवर लुईसने तिची स्टोरी शेअर केली. त्यात ती म्हणाली की, गेल्यावर्षी तिने कॅन्सरमुळे वडिलांना गमावलं होतं. काही दिवसांपूर्वी तिलाही पायावर एक नवा तीळ दिसला. जर तिच्या वडिलांसोबत असं काही झालं नसतं तर तिने टेस्ट केली नसती.

पण वडिलांच्या निधनानंतर तिने तिची टेस्ट करून घेतला आणि त्यात कॅन्सरची बाब समोर आली. ती वेळीच सर्जरी करू शकली. वेळीच टेस्ट केल्याने झीरो स्टेजवरच कॅन्सरची माहिती मिळाली होती.

डॉक्टरने तिच्या मांडीतून कॅन्सरचा तीळ काढलाय. वेळीच सर्जरी करून डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला. लुईसने तिची सर्वायवल स्टोरी लोकांसोबत शेअर केली आहे. सोबतच सांगितले की, तुमच्या शरीरावर असं काही डाग किंवा निशाण असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा.

स्कीनकेअर डॉट ऑर्गनुसार, हा कॅन्सरही जीवघेणा ठरू शकतो. जर वेळीच तुम्ही या कॅन्सरची ओळख पटवली नाही तर याने तुमचा जीवही जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया या कॅन्सरचे सर्वात जास्त रूग्ण आढळतात. हा कॅन्सर जास्तकरून १५ ते ३९ वर्षांच्या लोकांना आपली शिकार करतो.