शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाहावं ते नवल! त्यांनी व्हॉट्स अॅप स्टाइलमध्ये छापली लग्नपत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 8:37 PM

1 / 7
लग्नसोहळ्याप्रमाणाेच लग्नपत्रिकाही अविस्मरणीय असावी यासाठी हल्ली वेगवेगळ्या स्टाइलच्या लग्नपत्रिका छापण्याचा ट्रेंड आला आहे. दरम्यान, सूरतमधील आरजू आणि चिंतन यांनी आपल्या विवाहाची पत्रिका चक्क व्हॉट्स अॅपच्या स्टाइलमध्ये छापून घेतली आहे.
2 / 7
या पत्रिकेच्या बाह्य आवरणापासून मुख्य निमंत्रण पत्रिकेपर्यंत सर्वत्र सजावट करण्यासाठी व्हॉट्स अॅपवरील विविध फिचरचा वापर करण्यात आलेला आहे.
3 / 7
सध्याच्या सोशल मीडियामध्ये व्हॉट्स अॅप हे सर्वाधिक वापरण्यात येते. त्यामुळे आरझू आणि चिंतन यांनी त्याचाच आपल्या लग्नपत्रिकेत खुबीने वापर करून घेतला आहे. निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्टावर व्हॉट्स अॅपसारखे प्रोफाइल पेज दाखवण्यात आले आहे. तसेच प्रोफाइल पिक्चरमध्ये वधु-वरांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.
4 / 7
निमंत्रणासाठी चॅटिंगचा वापर करण्यात आला आहे.
5 / 7
लग्नपत्रिकेत चॅटिंगचा कलात्मक दृष्टीने केलेला वापर.
6 / 7
मला गुजरातीमध्येच पण जरा वेगळी अशी लग्नपत्रिका तयार करायची होती. त्यामधून व्हॉट्स अॅपस्टाइलमध्ये पत्रिका तयार करण्याची कल्पना सुचली, असे आरझू सांगते.
7 / 7
व्हॉट्स अॅपवर येणाऱ्या मेसेजचाही विवाहाविषयी माहिती देण्यासाठी खुबीने वापर करण्यात आला आहे.
टॅग्स :marriageलग्नGujaratगुजरात