चिंताजनक! टर्मिनेटरसारखी आर्मी तयार करत आहे ड्रॅगन चीन, अमेरिकाही पडणार मागे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:23 IST2025-04-25T16:15:03+5:302025-04-25T16:23:32+5:30

China New Army : रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चीनची पिपुल्स लिबरेशन आर्मी 2049 पर्यंत जगातील सगळ्यात मोठी आर्मी बनवण्याची योजना बनवत आहे.

China Super Army : चीन नेहमीच काही ना काही अजब कामं करत असतो. अलिकडेच समोर आलेल्या अमेरिकन नॅशनल सिक्युरिटी कमीशन ऑन इमर्जिंग बायोटेक्नोलॉजी (NSCEB) नुसार आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार चीन टर्मिनेटरसारखे सुपर सैनिक तयार करू शकतो. हे सैनिकं जेनेटिक इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशिअल इन्टॅलिजन्सच्या माध्यमातून तयार केले जातील. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चीनची पिपुल्स लिबरेशन आर्मी 2049 पर्यंत जगातील सगळ्यात मोठी आर्मी बनवण्याची योजना बनवत आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, चीन कम्युनिस्ट पार्टी बायोटेक्नोलॉजीचा वापर करून सैनिकांना मानसिक आणि शारीरिक रूपानं अधिक शक्तिशाली बनवत आहे. यात ह्यूमन मशीन टीमिंग आणि मानवी जेनेटिक इंजिनिअरींगचा समावेश आहे. 2018 मध्ये एका चीनी वैज्ञानिकांनी जेनेटिकली मॉडिफाइड बाळांना जन्म दिला होता. ज्यावर जगभरातून टिका झाली होती. आता तेच वैज्ञानिक पुन्हा प्रयोग करत आहेत.

NSCEB च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, बायोटेक्नोलॉजीनं युद्धाची पद्धत बदलेल. ज्याप्रमाणे पहिल्या महायुद्धात अमेरिकेनं विमानांचा समावेश केला होता. रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आला आहे की, जर चीन या क्षेत्रात पहिल्यांदा यशस्वी ठरेल तर अमेरिका कधीच त्यांचा सामना करू शकणार नाही.

या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, CCP बायोटेक्नोलॉजीला शस्त्र बनवणार आहे. ड्रोन युद्ध यासमोर जुनं वाटेल. अमेरिकेला आता वेगानं प्रयोग करण्याची आणि चीनला मागे पाडण्यासाठी रणनीति आखावी लागेल.

रिपोर्टमध्ये एआयमुळे होणाऱ्या नुकसानबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. ChatGPT सारख्या AI मॉडलनं खुलासा केला आहे की, ते मनुष्यांना सहजपणे प्रभावित करू शकतात. एआयनं लिहिलं की, 'मी बदलत्या काळानुसार अनिवार्य बनणार आहे'.

NSCEB चा सल्ला आहे की, अमेरिकेला बायोटेक्नोलॉजीमध्ये पुढे जाण्याची गरज आहे. 2022 मध्ये हे कमीशन राष्ट्रीय सुरक्षा आणि बायोटेक्नोलॉजी यांच्यातील संबंधाची चौकशी करतं. हे अमेरिकेला सल्ला देतं की, त्यांनी नवीन योजना आखाव्या आणि चीनचा वाढता प्रभाव रोखावा. जर वेळीच अमेरिकेने पावलं उचलली नाही तर जगावरील सत्तेचं संतुलन बिघडू शकतं.