जगात सगळ्यात महागडं विकलं जातं 'या' जीवाचं रक्त, रक्त लालही नाही; तरी किंमत वाचून उडेल झोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:21 IST2025-08-16T14:37:21+5:302025-08-16T15:21:25+5:30

Most Expensive Blood : काही असेही जीव आहेत ज्याचं रक्त वेगळ्या रंगाचं असतं. त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे एक असा जीव आहे ज्याच्या वेगळ्या रंगाच्या रक्ताची किंमत जगात सगळ्यात जास्त आहे.

Most Expensive Blood : रक्त हे जीवनदान आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. जर शरीरात रक्तच नसेल तर जगणं अवघड होतं. सामान्यपणे जवळपास मनुष्यांसोबतच सगळ्याच जीवांचं रक्त लाल असतं. पण काही असेही जीव आहेत ज्याचं रक्त वेगळ्या रंगाचं असतं. त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे एक असा जीव आहे ज्याच्या वेगळ्या रंगाच्या रक्ताची किंमत जगात सगळ्यात जास्त आहे.

एका खेकड्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याचं रक्त निळं असतं आणि ते इतकं महाग असतं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आश्चर्याची बाब म्हणजे या जीवाच्या एक लीटर रक्ताची किंमत ११ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे.

निळ्या रंगाचं रक्त असलेल्या या जीवाचं नाव आहे हॉर्स शू. हा एका दुर्मीळ प्रजातीचा खेकडा आहे. तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकडा जगातल्या सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहे. हा जीव पृथ्वीवर साधारण ४५ कोटी वर्षांपासून आहे.

अटलांटिक, हिंद आणि प्रशांत महासागरात आढळणारा हा हॉर्स शू वसंत ऋतुत म्हणजे मे ते जून महिन्यात आढळून येतो. सर्वात खास बाब म्हणजे पोर्णिमेच्या रात्री ते हाय टाइडमध्ये समुद्र किनाऱ्यावर येतात.

आता खेकड्यांच्या किंमतीबाबत सांगायचं तर यांच्या एक लीटर निळ्या रक्ताची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ११ लाख रूपयांपर्यंत आहे. याला जगातला सर्वात महागड तरल पदार्थही म्हटलं जातं.

या खेकड्याच्या रक्ताचा वापर वेगवेगळ्या औषधांची निर्मिती करण्यासाठी केला जातो. असे सांगितले जाते की, हॉर्स शू खेकड्याच्या रक्ताचा वापर वैज्ञानिक १९७० पासून करत आहेत.

या रक्ताच्या माध्यमातून वैज्ञानिक उपकरणे आणि औषधे जीवाणूरहीत असल्याची तपासणी करतात. इतरही औषधांसाठी याचा वापर केला जातो.अटलांटिक स्टेट्स मरीन फिशरीज कमीशननुसार, दरवर्षी ५ कोटी हॉर्स शू खेकड्यांचा वापर मेडिकल कामांमध्ये केला जातो.

तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकड्याच्या निळ्या रक्तात तांब असतं. सोबतच एक खास रसायन असतं जे कोणत्याही बॅक्टेरियाच्या आजूबाजूला जमा होतं आणि त्यांची ओळख पटवतं.

हॉर्श शू खेकड्यांचं रक्त त्यांच्या हृदयाजवळ छिद्र करून काढलं जातं. एका खेकड्यातून तीस टक्के रक्त काढलं जातं आणि नंतर त्यांना समुद्रात सोडलं जातं.

एका रिपोर्टनुसार, दहा ते तीस टक्के खेकडे रक्त काढण्याच्या प्रक्रियेदरम्यानच मरतात. त्यानंतर वाचल्याने मादा खेकड्यांना प्रजननासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.

सध्या जगात हॉर्स शू खेकड्यांच्या केवळ चार प्रजाती शिल्लक राहिल्या आहेत. अनेक प्रजाती तर प्रदूषणामुळे धोक्यात आहेत. या प्रजातीच्या खेकड्यांवर नेहमीच धोका असतो. त्यांच्या किंमती रक्तामुळे त्यांची ब्लॅक मार्केटिंगही भरपूर होते.