हे आहेत आकाशात उंचावर भरारी घेणारे पक्षी, यांच्या उड्डाणासमोर गगनही पडते ठेंगणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 03:58 PM2019-09-16T15:58:05+5:302019-09-16T16:16:04+5:30

आकाशात उंचावर भरारी घेणाऱ्या पक्ष्यांविषयी मानवाला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. आज जाणून घेऊयात आकाशात अगदी उंचावर भरारी घेणाऱ्या काही पक्ष्यांविषयी...

हा पक्षी सुमारे १६ हजार फूट (४ हजार ८००) उंचीपर्यंत मुक्तपणे विहार करू शकतो.

बार टेल्ड गॉडविट हा पक्षी सुमारे २० हजार फुटांवर उड्डाण करण्याची क्षमता बाळगतो.

बदक सहजा उडत नाही. मात्र मालार्ड डक हे जंगली बदक सुमारे २१ हजार फूट उंचीवरून उड्डाण करते.

एंडियन कोंडोर हा पक्षी २१ हजार ३०० फुटांपर्यंत उड्डाण करू शकतो.

बिर्डड वल्चर हा पक्षी सुमारे ७ हजार ३०० मीटर म्हणजेच तब्बल २४ हजार फूट उंचीवरून सहजपणे विहार करतो.

साधारण कावळ्यासारखा दिसणारा अल्पाइन चाफ हा पक्षी ८ हजार मीटर म्हणजेच २६ हजार ५०० फूट उंचीवरून उडण्यास सक्षम आहे.

हुपर स्वान हा हंसासारखा दिसणारा पक्षी सुमारे ८ हजार २०० मीटर म्हणजेच २७ हजार फूट उंचीवरून उडण्याची क्षमता बाळगतो.

बार हेडेड गुस हा पक्षी ८ हजार ४८१ मीटर म्हणजेच 27 हजार 825 मीटर उंचीवरून सहज विहार करतो.

कॉमन क्रेन हा पक्षी १० हजार मीटर म्हणजेच ३३ हजार फूट उंचावरून सहजपणे विहार करतो.

रुपल्स ग्रिफॉन वल्चर हा गिघाडांच्या श्रेणीतील पक्षी तब्बल ११ हजार ३०० मीटर म्हणजे ३७ हजार फूट उंचीवरून सहजपणे उड्डाण करतो.