एक 'असा' धातू; ज्याच्या कोटिंगमुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा होतो खात्मा; जाणून घ्या धातूबाबत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 04:45 PM2020-06-24T16:45:32+5:302020-06-24T17:14:35+5:30

जगभरात दरवर्षी कोट्यावधी लोकांचा मृत्यू होतो. होय. ज्या वेगाने किटाणू अन्य जीव जंतू व्हायरस एंटीबायोटीक औषधांपेक्षा आपली क्षमता वेगाने वाढवत आहेत. त्यामुळे या किटाणूंशी लढण्यासाठी एंटीबायोटिक औषधं निष्क्रिय ठरत आहेत. म्हणून अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. दरवर्षी जगभरातून अश्या अनेक लोकांचा मृत्यू होतो. ज्यांच्यावर औषधांचा काहीही परिणाम होत नाही.

कोरोना विषाणू प्लास्टीक किंवा स्टील अशा जागांवर तीन दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो. काही बॅक्टेरिया तर अनेक महिन्यांपर्यंत एखाद्या जागी जीवंत राहू शकतात. म्हणून घरात किंवा ऑफिसमध्ये आपल्या वापराच्या वस्तू नेहमी स्वच्छ आणि साफ ठेवायला हव्यात

तांबे मिश्रित धातू उत्तम मानला जातो. या धातूमध्ये ९९.९ टक्के बॅक्टेरिया मारण्याची क्षमता असते. प्राचीनकाळात भारतातील लोक तांब्याच्या भांड्यातंच जेवण बनवत असत. आजही तांब्याच्या भांड्यात जेवण तयार करणं आरोग्यासाठी चांगले असल्याचे लोकांचे मत आहे. हा धातू महाग असल्यामुळे कमी प्रमाणात वापरला जातो. तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे किंवा जेवण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहीत असतील.

याऐवजी लोक स्टील किंवा प्लास्टिकचा वापर करतात. तांब्याची भांडी धुण्यासाठी खूप किचकट असतात. म्हणून लोकांना अशी भांडी वापरायला आवडत नाही. तुमच्याकडे अशी भांडी नसतील तर कोटींग नक्कीच करता येऊ शकते.

डोअर बेल, लिफ्टचे बटन, दरवाज्याचे हॅण्डल, यांवर तांब्याचे कोटींग केल्यास व्हायरस किंवा बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्यामते मेडिकल ट्रांसप्लाटसाठीसुद्धा या धातूचा वापर केला जाऊ शकतो. तज्ज्ञ सुद्धा एंटी बॅक्टेरिअल सरफेस तयार करण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करत आहेत.

टाइटेनियम मिश्रित धातुंबाबाबत जास्त उत्साहित आहे. उच्च तापमानात या धातूला वितळवता येऊ शकतं. त्यातून तयार होत असलेल्या पदार्थापासून किटाणूंना मारता येऊ शकतं. व्हायरसला निष्क्रिय करण्यासाठी अशा प्रकारच्या सरफेसचा वापर केला जातो. स्वतःला व्हायरसपासून वाचवण्यासाठी आपण निसर्गाकडून प्रेरणा घेऊ शकतो.

चहाच्या झाडांमधून निघत असलेल्या तेलात एंटीवायरल एरोसॉल असते. त्याच्या संपर्कात आल्यानंतर ५ ते १५ मिनीटांच्या आत ९५ टक्के व्हायरस नष्ट होऊ शकतो.

सध्या कोरोना विषाणूंचा प्रसार वेगाने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोनावर मात करण्यासाठी अशा धातुंचा वापर करणं उत्तम ठरेल.

(Image credit- Fast company, The week, machine desingn)