कधी पाहिलाय का 18 इंचाचा घोडा, 8 मिलीमीटरचा मासा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 03:47 PM2018-07-02T15:47:43+5:302018-07-02T15:52:08+5:30

स्विस मिनी गनचा आकार अतिशय लहान आहे. मात्र या गनमधून 270 मैल प्रति तास वेगानं गोळी सुटते. त्यामुळे या गनमधून सुटलेल्या गोळीनं एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो.

मायक्रोडेव या घोड्याची उंची केवळ 18 इंच इतकी आहे. हा जगातील सर्वात लहान घोडा आहे.

चॅनेल बेटावरील या तुरुंगात फक्त दोन कैद राहू शकतात. 1856 मध्ये या तुरुंगाची उभारणी करण्यात आली होती.

पिडिसप्रिस प्रोजेनेटिका हा जगातील सर्वात लहान मासा आहे. सुमात्रा, इंडोनेशियात आढळून येणारा हा मासा फक्त 7.9 मिलीमीटर लांबीचा आहे.

जगातील सर्वात लहान कृत्रिम हृदयाचं वजन फक्त 11 ग्रॅम आहे. एखाद्या गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या नवजात बालकासाठी हे हृदय वरदान ठरु शकतं.