स्वयंवर - या 8 अटी मान्य केल्यास 'होणार ही तुमची बायको'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 19:16 IST2018-11-28T19:03:22+5:302018-11-28T19:16:24+5:30

लग्नाचं स्वयंवर ही प्राचीन काळातील प्रथा आहे. पण आजही काही वेगेवगळ्या अटी ठेवून लग्नं स्वयंवर ठेवण्यात येतं.
ऑस्ट्रेलियन महिलेनं अशीच अट ठेवून आपल्या लग्नाचं स्वयंवर रचलं आहे. त्यामध्ये तिने 8 शर्ती व अटी मांडल्या आहेत.
नवऱ्याने प्रत्येकवेळी घर साफ केलं पाहिजे, तसेच मुलींशी मैत्री करू नये व लग्न झालेल्या मुलांशीच मैत्री करावी.
स्मोकींग करण्याऱ्या मुलाने सिगारेट ओढणे सोडून द्यावे.
नवऱ्याला वर्षातून केवळ दोनदा मद्यपान करण्याची मुभा, तर पॉर्न अन् गेमिंगला बंदी
पत्नीला सोडून कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात पतीला जाता येणार नाही. तिच्या या यादीवरुन तरुणीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
नवऱ्यानं आठवड्यात 50 तास काम करणं गरजेचं आहे. यासह इतरही क्षुल्लक अटी या तरुणीने घातल्या आहेत.