शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वैज्ञानिकांनी शोधला जगातला सर्वात मोठ्या आकाराचा साप, फोटो पाहूनच फुटेल घाम...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 4:32 PM

1 / 11
जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहतात. यातील काही प्राण्यांबाबत आपल्याला पुस्तकातून माहिती मिळते. अनेक प्रजातीच्या प्राण्यांवर वर्षानुवर्षे वैज्ञानिक रिसर्च करत असतात. हे प्राणी आहेत की नाही यावरून नेहमी वाद-विवाद होत असतात. डायनासॉर कुणी बघितले नाहीत, पण त्यांच्या फॉसिलमुळे ते असल्याचे पुरावे मिळाले. असंच काहीसं अॅनाकोंडाबाबत झालंय.
2 / 11
हे विशाल साप जंगलात मनुष्यांपासून दूर राहतात. आपण नेहमीच यांच्याबाबत पुस्तकात वाचतो किंवा सिनेमात बघत असतो. या सापांचा आकार प्रश्न पडतो की, खऱंच इतके भव्य साप होते का? अनेकांना तर हे साप केवळ कल्पनाही वाटत असतील.
3 / 11
मात्र, आता वैज्ञानिकांनी जगातल्या सर्वात मोठ्या सापाचा शोध लावला आहे. या सापाची लांबी ४२ फूट आहे. हा साप अॅनाकोंडा सिनेमात दाखवलेल्या सिनेमापेक्षाही मोठा आहे. या सापाची प्रतिकृती वैज्ञानिकांनी तयार केली. चला जाणून या सापाबाबत काही गोष्टी.....
4 / 11
अखेर अनेक वर्षांच्या शोधानंतर वैज्ञानिकांनी जगातल्या सर्वात मोठ्या सापाचा शोध लावलाय. हा साप आजपासून ५० ते ६० मिलियन वर्षांआधी पृथ्वीवर होते.
5 / 11
आता हे साप लुप्त झाले असून त्यांचं नाव तितनोबोआ होतं. त्यांना टायटॅनिक बोआ असंही म्हटलं जात होतं. हा आतापर्यंत सापडलेल्या सापांपैकी सर्वात मोठा साप आहे. या सापाचा आकार एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखाच आहे.
6 / 11
वैज्ञानिकांनुसार, हे साप डायनासॉर लुप्त झाल्यावर ६५ मिलियन वर्षे पृथ्वीवर होते. यांचा आकार ४२ फूट होता. तसेच या सापांचं वजन १ हजार १७९ किलो होतं असा अंदाज आहे.
7 / 11
रिसर्चमधून समोर आले की, साप डायनासॉर लुप्त झाल्यावर जगावर राज्य करत होते. हे साप अॅमेझॉनच्या जंगलात होते. येथील गरम वातावरण त्यांना जिवंत राहण्यासाठी मदत करत होतं.
8 / 11
रिसर्चमधून समोर आले की, साप डायनासॉर लुप्त झाल्यावर जगावर राज्य करत होते. हे साप अॅमेझॉनच्या जंगलात होते. येथील गरम वातावरण त्यांना जिवंत राहण्यासाठी मदत करत होतं.
9 / 11
वैज्ञानिकांनी खुलासा केला की, हे साप पलोन एपोच पिरियडमध्ये होते. म्हणजे हे साप ३० ते ३४ डिग्री सेल्सिअसमध्ये जिवंत राहू शकत होते. यांच्या साइजबाबत वैज्ञानिकांनी खुलासे केले आहेत.
10 / 11
असे सांगितले जाते की, तापमानामुळे या सापांचा आकार इतका मोठा होता. गरम तापमानात राहणारे साप मॉडर्न सापांच्या तुलनेत जास्त मोठे होते. या बोआ सापांचा फॉसिल २००९ मध्ये कोलंबियामध्ये वैज्ञानिकांना आढळला होता. फ्लोरिडा म्युझिअमने या फॉसिलची माहिती दिली होती.
11 / 11
वैज्ञानिकांनी सांगितले की, सिनेमात दाखवण्यात आलेला अॅनाकोंडा साप याच्यापेक्षा फार लहान होता. यांच्या खाण्याबाबत सांगण्यात आले की, हे वर्षातून दोन ते तीन वेळाच खात होते. पण जेव्हाही खात होते तेव्हा एक मगर लगेच पचवत होते. तसेच ते कासव आणि मासेही खात होते.
टॅग्स :snakeसापJara hatkeजरा हटकेResearchसंशोधनInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स