जगातील एक असं एकुलतं एक शहर जिथे ना रस्ते आहेत, ना वाहनं; तरी दरवर्षी लाखो पर्यटक करतात इथे गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:23 IST2025-12-24T15:29:27+5:302025-12-24T16:23:42+5:30
Interesting Facts : जगात एक असंही शहर आहे जिथे ना वाहनं आहेत ना रस्ते आहेत. तरीही दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. या शहराची नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरण लोकांना आपोआप आकर्षित करतं.

Interesting Facts : जगात असे अनेक शहरं आहेत जे इतर शहरांपेक्षा कितीतरी वेगळेपण जपतात. आपल्यालाही हेही माहीत आहे की, जगात सगळीकडेच कार, बाईक, ट्रक, बस अशी वाहनं रस्त्यांवर धावताना दिसतात. पण आपल्याला वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल की, जगात एक असंही शहर आहे जिथे ना वाहनं आहेत ना रस्ते आहेत. तरीही दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. या शहराची नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरण लोकांना आपोआप आकर्षित करतं. चला तर मग या अनोख्या शहराबद्दल आणि तिथे कसं पोहोचायचं ते जाणून घेऊया.

गीथोर्न असं या शहराचं नाव आहे. इथे आपण नावेतून फेरफटका मारू शकता आणि स्थानिक रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकता. येथील बाजारांतून तुम्ही स्थानिक उत्पादनेही खरेदी करू शकता.

गीथोर्नला जायचं असल्यास सर्वप्रथम आपल्याला ॲम्स्टर्डमला यावं लागेल. ॲम्स्टर्डमवरून बस किंवा ट्रेनने गीथोर्नला सहज पोहोचता येतं.

येथे तुम्ही नाव भाड्याने घेऊन कालव्यांमधून फिरू शकता, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकता आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. पर्यटकांसाठी येथे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बोट भाड्याने देण्यासारख्या सर्व सोयी उपलब्ध आहेत.

गीथोर्न आपल्या सौंदर्य आणि शांततेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो लोक येथे पर्यटनासाठी येतात. येथील सुंदर आणि शांत वातावरण प्रत्येकाला मोहात पाडतं. याशिवाय, गीथोर्नमधील घरे अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी आहेत. ही घरे कालव्यांच्या काठावर बांधलेली आहेत.

हे शहर नेदरलँड्समध्ये स्थित असून याचं नाव गीथोर्न आहे. याला अनेकदा ‘नेदरलँड्सचं व्हेनिस’ असंही म्हटलं जातं. या शहरात कुठेही रस्ते नाहीत, सर्वत्र पाणीच पाणी आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोक नौकांचा वापर करतात.

















