हैद्राबादच्या 'या' राजकुमारीच्या सौंदर्याची जगभरात होती चर्चा, हॉलिवूडमधूनही मिळाल्या होत्या ऑफर....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 11:29 AM2020-08-20T11:29:03+5:302020-08-20T11:43:11+5:30

तुर्कीचे ओट्टोमन राजशी परिवारातील शेवटची राजकुमारी नीलोफरला सुंदरतेची देवी म्हटलं जात होतं. हिचा जन्म तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये झाला होता.

तुम्ही अशा अनेक राण्यांबाबत किंवा राजकुमारींबाबत ऐकलं असेल ज्या केवळ त्यांच्यां सुंदरतेसाठी लोकप्रिय होत्या. त्यांचं सौदर्य आजही इतिहासाच्या पानांवर अमर आहे. अशात आज आम्ही तुम्हाला एका अशा राजकुमारी बाबत सांगणार आहोत जिचा समावेश जगातल्या सर्वात सुंदर महिलांमध्ये होत होता. इतकेच नाही तर या राजकुमारीला हॉलिवूडमधूनही अनेक ऑफर मिळाल्या होत्या.

तुर्कीचे ओट्टोमन राजशी परिवारातील शेवटची राजकुमारी नीलोफरला सुंदरतेची देवी म्हटलं जात होतं. हिचा जन्म तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये झाला होता. नीलोफरच्या जन्मावेळी तुर्की राजपरिवार शेवटच्या घटका मोजत होता आणि त्यांचं साम्राज्य नष्ट होत होतं. केवळ २ वर्षांची असताना नीलोफरने वडिलांना गमावलं. सात वर्षांची असताना ती आईसोबत तुर्की सोडून फ्रान्सला गेली. फ्रान्समध्ये त्यांचं जीवन सामान्य झालं होतं.

नीलोफरने आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिले. पण नीलोफरच नशीब जोरावर होतं आणि जगातल्या सर्वात श्रीमंत राज परिवार हैद्राबादच्या निजामाची सून झाली. हैद्राबादचे शेवटचे निजामान नीलोफरचं लग्न त्याचा दुसरा मुलगा आजम जेहसोबत लावून दिलं होतं. १९३१ मध्ये लग्नानंतर नीलोफर हैद्राबादला आली. असे सांगितले जाते की, नीलोफर केवळ सुंदर नव्हती तर तिच्यात एक वेगळं आकर्षण होतं.

लग्नानंतर नीलोफर जेव्हा हैद्राबादला आली तेव्हा निजामाच्या परिवारात महिलांसाठी पडदा पद्धत होती. पण नीलोफर कधीही पडद्यात राहिली नाही. उलट या परिवारातील महिलांसाठी सार्वजनिक जीवनाचे दरवाजे तिने उघडले. नीलोफर हैद्राबादच्या पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होती. पण नीलोफरचं हे वागणं पाहून निजामाची बेगम दुल्हन पाशा फार नाराज होता. असे सांगितले जाते की, ती तिच्या सूनेला विष मारण्याचा कट करत होती.

नीलोफर राजपरिवातील असण्यासोबतच फॅशन दिवा होती. तिचे साडी नेसलेले फोटो न्यूयॉर्क फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये लागले आहेत. नीलोफरच्या साड्या बनवण्याचं काम फ्रान्समधील एक कंपनी करत होती. पण एक वेळी अशीही आली की, तिने साड्यांचा वापर सोडला आणि वेस्टर्न ड्रेस घालू लागली.

१९४८ मध्ये जेव्हा हैद्राबादचा भारतात समावेश झाला तेव्हा नीलोफर फ्रान्सच्या दौऱ्यावर होती. ती पॅरिसमध्येच थांबली होती. नीलोफर जेव्हा फ्रान्समधून परत आली नाही तर तिच्या पतीने दुसरं लग्न केलं होतं. १९५२ मध्ये त्यांना घटस्फोट घेतला. यावेळी तिला पोटगी म्हणून मोठी रक्कम मिळाली. यातून तिने हैद्राबादमधील महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी एक हॉस्पिटल बनवलं.

नीलोफर तिच्या काळातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक होती. अनेक वर्ल्ड मॅगझिनने तिला जगातल्या १० सर्वात सुंदर महिलांमध्ये निवडलं होतं. आपल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर ती फ्रान्समध्ये आईसोबत राहू लागली होती. यादरम्यान तिला हॉलिवूडमधून अनेक ऑफरही आल्या होत्या. ज्या तिने नाकारल्या. काही वर्षाने तिने अमेरिकन तरूण एडवर्ड पोपसोबत लग्न केलं. १९८९ मध्ये नीलोफरचं निधन झालं.