Mango Variety: हा खाऊ का तो खाऊ...आंब्याच्या 'या' 9 जातींची बातच न्यारी: पोट भरेल पण मन भरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 08:16 PM2023-04-13T20:16:54+5:302023-04-13T20:20:56+5:30

Mango Variety: या मोसमात घ्या सर्वात चविष्ट आंब्याचा आस्वाद. एकदा खाल तर खातच राहाल...

Mango Variety: फळांचा राजा आंबा सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत, सर्वांनाच आवडतो. हा वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे जवळपास सर्वजण आंब्याचा आस्वाद घेतात. सध्या आंब्याचा हंगाम आहे, पण कोणता आंबा खायचा, हा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असेल. काहींना हापुस आवडतो तर काहींना दशेरी आवडतो. आम्ही तुम्हाला आंब्याच्या 10 जातींबद्दल सांगणार आहोत, ज्यांची चव तुम्ही चाखायलाच हवी.

दशेरी आंबा- दशेरी आंबा सर्वात प्रसिद्ध आहे, कारण याची चव खूप गोड आहे. या आंब्याचा रंग हलका पिवळा आणि हिरवा असतो. याचा लगदा पूर्णपणे केशरी रंगाचा असतो.

लंगडा आंबा- लंगडा आंब्याचे नाव ऐकून थोडं विचित्र वाटलंच असेल, पण हा गोल आणि हिरव्या रंगाचा आंबा असतो. हा दिसायला हिरवा असला तरी खूप गोड असतो.

हापुस आंबा- हापुसला आंब्याचा राजा म्हटले जाते. हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकणात आढळतो. याची किंमतही खूप जास्त असते. याचा रंग पूर्णपणे पिवळा असून, साखरेसारखे गोड असतो.

चौसा आंबा- चौसा आंबा जितका हिरवा दिसतो तितकाच तो आतून गोड असतो. याची साल खूप मऊ असते. आतून हलका पिवळा रंग असून तो दिसायला खूप मोठा आहे. पण हा फार कमी वेळा बाजारात येतो.

पांढरा आंबा- लहान आणि चमकदार पिवळ्या रंगाचा हा आंबा आंध्र प्रदेशात तयार होतो. या आंब्याची साल खूप पातळ असते आणि आतील लगदा फायबरने भरलेला असतो. हा आंबा बहुतेक मँगो शेक बनवण्यासाठी वापरला जातो.

गुलाब खस आंबा- गुलाबखास आंबा अगदी गोलाकार असतो. त्याचा वरचा भाग गुलाबी रंगाचा असतो. पिकल्यानंतर खूप गोड लागतो. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये त्याचे उत्पादन अधिक आहे.

हिमसागर आंबा- पश्चिम बंगालमध्ये हिमसागर आंब्याचे अधिक उत्पादन होते. हा चव आणि सुगंधासाठी ओळखला जातो. त्यात लहान कोय आणि भरपूर लगदा असतो.

नीलम आंबा- नीलम आंब्याची लागवड उत्तर प्रदेशातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये केली जाते, परंतु आंध्र प्रदेशात त्याची चांगली विविधता घेतली जाते. हा आंबा फिक्कट पिवळ्या रंगाचा आणि खायला खूप गोड असतो.

तोतापुरी आंबा- तोतापुरी आंबा दक्षिण भारतात घेतला जातो. हा आंबा खालून तीक्ष्ण असतो आणि त्याची साल खूप जाड असते, पण हा आंबा भारतात फार कमी वेळा मिळतो.