बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 05:33 PM2020-11-15T17:33:39+5:302020-11-15T17:44:09+5:30

जगभरात तुम्हाला असे अनेक लोक भेटतील ज्यांच्या वेडेपणाला काही सीमा नसते. सध्याच्या काळात प्रँकच्या नावावर मुलं काहीही करताना दिसून येतात. सोशल मीडियावर प्रँक्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्यामुळे मुलांना सतत असं काही करण्याची सवय लागली आहे.

प्रँक करण्याच्या नादात इजिप्तचा रहिवासी असलेल्या एका तरूणाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. एका मुलाने आपल्या मित्रासोबत प्रँक करण्याच्या नादात मोबाईल गिळला. नैसर्गिक पद्धतीने मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. अनेक महिन्यांनी पुन्हा डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सर्जरी केली आणि त्यातून मोबाईल बाहेर काढला.

ही घटना इजिप्तची असून एक मुलगा मोबाईच्या रिंगटोनचा आवाज आपल्या मित्राच्या पोटातून ऐकू इच्छित होता. पण हा प्रँक खूपच महागात पडला. चुकून त्यानं मोबाईल गिळून टाकला.

मोबाईल बाहेर काढण्यासाठी अनेक घरगुती उपाय करण्यात आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जेव्हा सात महिन्यांनंतर या मुलाचा त्रास वाढला तेव्हा डॉक्टरांकडे जाण्याचा विचार केला. उत्तर कैरौतील बेहाना प्रांतातील एका रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

डॉक्टर मोहाम्मद अल जहर यांनी या मुलाचे अल्ट्रासाऊंड केले. यात दिसून आलं की, या मुलाच्या पोटात मोबाईल आहे. तसंच हा मोबाईल नैसर्गिकरित्या बाहेर येण्याचे काहीही चांन्सेस नव्हते. म्हणून डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.

या तरूणाबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. या तरूणानं आपली ओळख लपवण्याबाबत विनंतीसुद्धा केली होती. सध्या या घटनेमुळे सर्वचजण हैराण झाले आहेत.( Image Credit-Asianetnews)