प्लास्टीकच्या बाटल्यांचं आकर्षक रूप पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:00 PM2019-12-31T15:00:32+5:302019-12-31T15:14:16+5:30

सध्या सगळ्या ठिकाणी प्लास्टीकच्या वापराबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. कारण प्लास्टीकच्या वापरामुळे पर्यावरणाच होणारं मोठं नुकसान थांबवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जातात. पण मोठ्या प्रमाणात तयार होणारा प्लास्टीकचा कचरा रोखणं म्हणजे आवाहनच आहे.

त्यासाठी काहीजण वाया जात असलेल्या प्लास्टीकचा सुयोग्य वापर करण्यासाठी त्यापासून दैनंदिन वापराच्या पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तुम्हाला असेच काही टाकाऊपासून टीकाऊ तयार करण्यात आलेले फोटो बघता येणार आहेत

या फोटोत दिसत असलेल्या प्लास्टीकपासून शोभेच्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. हे खूप स्टाईलिश दिसत आहे.

प्लास्टीकचा वापर करून रोपट्यांच्या कुंड्या तयार केल्या आहेत. कोणतीही खर्चिक पध्दत न वापरता हे तयार करण्यात आले आहे.

पेन ठेवण्यासाठी प्लास्टीकचा स्टॅण्ड तयार करण्यात आला आहे. प्लास्टीकच्या बाटलीला मधोमध कापून हे तयार करण्यात आलं आहे. लाल रंगाची रिबीन लावून याचे सौंदर्य वाढवण्यात आले आहे.

वेगवेगळ्या रंगाच्या प्लास्टीकच्या बॉटलसचा वापर करून आकर्षक मेकअपचे ब्रश तसंच टुथूब्रश ठेवण्यासाठी स्टॅण्ड तयार करण्यात आला आहे.

पांढरा रंग असलेल्या प्लास्टीकच्या कॅनचा वापर करून त्याचा वापर मॅग्झीन्स ठेवण्यासाठी करण्यात आला आहे.

सुंदर अशी पिगी बॅंग प्लास्टीकचा वापर करून तयार करण्यात आली आहे.

प्लास्टीकच्या वापरातून एक मस्त शक्कल लढवलेली दिसून येत आहे. यात पक्षांना खायला ठेवण्यासाठी प्लास्टीकचा वापर करण्यात आला आहे.